‘या’ अभिनेत्रीच्या बहिणीचे करण जोहरवर गंभीर आरोप म्हणाली, कोणासोबत ‘झोपायचं’ हेही करणच सांगतो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – करण जोहर आणि कंगना रणौत यांच्यातील वाद हा सर्वांनाच माहीत आहे. करण जोहरने सिनेजगतात घराणेशाहीला प्रोत्साहन दिले आहे असे म्हणत इतरही अनेक आरोप कंगनाने करणवर केले आहेत. गेल्या अनेक वर्ष सुरु असलेला हा वाद आता पु्न्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण आता कंगनाची रंगोलीने करणवर गंभीर आरोप केले आहेत. रंगोलीने ट्विटरवर स्वयंघोषित सिनेरक्षक कमाल आर खानच्या ट्विटला उत्तर देत करणवर आरोप केले आहेत. या आरोपांनी नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केआरकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “माझ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करण जोहरने धर्मामधून इशान खट्टरची हाकालपट्टी केली आहे कारण ते त्याच्याशी कठोरपणे बोलत होता. त्यामुळे तो आता इशानसोबत यापुढे कोणताही सिनेमा करणार नाही.”

केआरकेच्या या ट्विटला रंगोलीने उत्तर देत म्हटले आहे की, “करण जोहर त्याने लॉंच केलेल्या प्रत्येक कलाकाराच्या मोठ्या कमाईतील फक्त मोठी टक्केवारीच घेत नाही तर, तो हेदेखील सांगतो की काय घालायचं आणि कोणासोबत झोपायचं.(सेक्स करायचा) टक्केवारी घेण्याचं एकवेळ मी समजू शकते कारण हॉलिवूड प्रॉडक्शन हाऊसदेखील असे करतात परंतु तो नेहमीच कलाकरांना पॅचअप ब्रेकअपसाठी आग्रह करतो असतो तेही त्याच्या ब्रँडच्या प्रसिद्धीच्या गरजेनुसार जे की एखाद्या स्वाभिमानी माणसाला कधीच मान्य होणार नाही. करिअर गेलं खड्ड्यात मनाची शांती जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही स्वत:च्या नजरेत पडाल, 4 पैसे तर कमवाल परंतु प्रत्यक्षरीत्या मात्र तुम्ही काहीच बनू शकणार नाहीत.” असे गंभीर आरोप रंगोलीने केले आहेत.

 

Loading...
You might also like