कबड्डीपटूची भूमिका असलेला कंगनाचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित 

मुंबई : वृत्तसंस्था – नेहमी वेगवेगळ्या भूमिका साकारण्यास प्राधान्य देणारी अभिनेत्री कंगना रनौत मणिकर्णिका नंतर एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगना तिच्या आगामी ‘पंगा’ चित्रपटात कबड्डीपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच तिच्या या चित्रपटाचा फर्स्टलुक प्रदर्शित झाला. आणि प्रदर्शनाची तारिख निश्चित करण्यात आली आहे.

कंगनाची ‘पंगा’ चित्रपट २४ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत प्रसिद्ध पंजाबी अभिनेता जस्सी गिल पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहे. चित्रपटात जस्सी गिल कंगनाच्या पतीची भूमिका साकारणार आहे. जस्सी व्यतिरिक्त चित्रपटात ऋचा चड्ढा आणि नीना गुप्तादेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

‘पंगा’ चित्रपट राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू यांच्यावर आधारित आहे. त्यामुळे पडद्यावर कबड्डी खेळताना नॅचरल वाटावे त्यासाठी  कंगनाने कबड्डीचे ट्रेनिंगही घेतले आहे. त्यामुळे कंगना सुद्धा चित्रपटात प्रोफेशनल खेळाडूंसारखी कबड्डी खेळताना दिसणार आहे.

कंगनाचा यावर्षी रिलीज झालेला ‘मणिकर्णिका’ चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला होता.त्यामुळे आगामी ‘पंगा’ चित्रपटात कंगनाचा नवीन लुक प्रेक्षकांना किती आवडतो ते आपल्याला चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल.