Video : अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर कंगना रणौतचा ‘निशाणा’, म्हणाली….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखावर हप्ता वसुलीचा गंभीर आरोप लावला होता. या आरोपावरून अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर देशमुखांनी राजीनामा दिला आहे. यावर अभिनेत्री कंगना रणौतने ट्विट करून देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. जे साधुंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करतात, त्यांचा पराजय निश्चित आहे. अनिल देशमुख ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे पाहा, काय काय होते ते असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे. अस्पष्टपणे कंगनाचे म्हणणे आहे की, तिचे अपमान करण्याची शिक्षा देशमुखांना मिळाली आहे.

कंगनाने 2020 मध्ये ठाकरे सरकारवर अनेक आरोप लावले होते. त्यानंतर देशमुखांनी कंगनाला येथे राहण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले होेते. कंगनाच्या एका चाहत्याने तिचा सप्टेंबर 2020 मधील एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. जेंव्हा बीएमसीने कंगनाच्या घरात तोडफोड केली होती. त्यावेळीचा हा व्हिडिओ आहे. त्यानंतर कंगनाने व्हिडिओच्या माध्यमातून ठाकरे सरकार आणि देशमुखांवर निशाणा साधला होता. आता हा व्हिडिओ एका चाहत्याने कंगनाला टॅग केला आहे. यावर कंगनाने लिहिले आहे की, जे साधुंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करतात. त्यांचा पराजय निश्चित आहे. #AnilDesmukh ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे पाहा, काय काय होत ते. #UddhavThackeray. तिचे हे ट्वीट सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून यावर युजर्स प्रतिक्रिया देत आहेत.