कंगना राणावत पुन्हा दिसणार बायोपीकमध्ये 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारल्यानंतर आता पुन्हा कंगना एका आत्मचरित्रपर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती राष्ट्रीय कबड्डीपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘पंगा’ असे या चित्रपटाचे नाव असून दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांनी ट्विटर वरून या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात कंगना राणावत, पंजाबी गायक-अभिनेता जस्सी गिल आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

[amazon_link asins=’B072XP1QB7,B074G3TJYF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dab9ad3f-a858-11e8-866d-a3b1936b60b6′]

‘माझ्या असण्याची वास्तविकता हे माझ्या आप्तजनांचा माझ्यावरच्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे. अशा परिवाला समर्पित प्रस्तुतकर्ते ‘पंगा’ कंगना राणावत, जस्सी गिल, नीना गुप्ता. फॉक्स स्टार हिंदी द्वारे निर्मित.’ असे ट्विट दिग्दर्शक अश्विनी तिवारी यांनी करत व्हिडीओ शेअर केला आहे.”पंगा “हा चित्रपट २०१९ ला प्रदर्शित होणार आहे.