Kangana Vs BMC : ‘हरामखोर’ शब्दाचा अर्थ ‘नॉटी’ ! न्यायमूर्ती सुद्धा झाले आश्चर्यचकित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून कंगना राणावत आणि संजय राऊत यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. त्यातच बीएमसीने कंगनाच्या ऑफिस वर केलेली कारवाई या सर्व गोष्टी आता हायकोर्टात आल्या आहेत. या सर्व प्रकरणाच्या विरोधात कंगना राणावत यांचे वकील विरेंद्र सराफ यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती.

आज या प्रकरणावर सूनवाई होणार होती. हे प्रकरण न्यायमूर्ती कथावाला व न्यायमुर्ती रियाज चागला यांच्यासमोर होते तेंव्हा कंगनाचे वकील सराफ म्हणाले की कंगना राणावतवर बीएमसी ने अन्याय केला आहे. मला बीएमसी चे अधिकारी आणि संजय राऊत यांची याचिका पाहायला वेळच दिला नाही. त्यामुळे मला त्याचे उत्तर नंतर देऊ द्यावेत तर संजय राऊत यांनी वापरलेल्या हारामखोर शब्दाची CD सराफ यांच्याकडे मागितली तेंव्हा सराफ म्हणाले की, संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी असा होतो तेंव्हा न्यायमूर्ती कथावाला म्हणाले की शब्दाचा अर्थ पाहायला आमच्याकडे शब्दकोश आहे. आणि आश्चर्याने परत विचारले की जर हरामखोर शब्दाचा अर्थ जर नॉटी असेल तर नॉटी चा अर्थ काय होतो. आणि विरेंद्र सराफ यांनी कंगणाच्या तोडफोड झालेल्या ऑफिस चे फोटो आणि व्हिडीओ देखील दिले. यावर कथावाला यांनी बीएमसी ला कोपरखळी देत म्हणाले की एवढ्या तत्परतेने जर बीएमसी ने कामे केली तर शहरात मोठ्या प्रमाणात बदल होतील.