मनात आलं की ‘बिनदास्त’ सेक्स करायला हवं, पालकांनीही परवानगी द्यायला हवी : अभिनेत्री कंगना रनौत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची क्विन कंगना रनौत आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. नुकतंच तिने असंच काहीसं बोल्ड आणि बिंधास्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे कंगना पुन्हा चर्चेत आली आहे. एका मोठ्या इव्हेंटला हजेरी लावलेल्या कंगनाने मीडियाशी बोलताना आपल्या काही खास गोष्टी सांगितल्या ज्या वाचल्यानंतर तु्म्हीही अवाक् व्हाल. 32 वर्षीय कंगनाने पहिल्यांदाच आपला बॉयफ्रेंड आणि रिलेशनशिपचा खुलासा केला आहे. यासोबतच तिने सेक्सबद्दलही बिंधास्त वक्तव्य केलं आहे.

‘जेव्हा तुमचं मन करेल सेक्स करायला हवा, पालकांनीही परवानगी द्यायला हवी’
कंगना म्हणाली, “सेक्स प्रत्येकाच्या आयुष्यात खूपच गरजेचा आहे. जेव्हा तुमचं मन करेल सेक्स करायला हवा. परंतु त्याची सवय करून घेणं चुकीचं आहे. पालकांच्या मते इतिहासात सेक्सला चुकीचं मानलं जात होतं, परंतु असं काहीच नाही. पूर्वी लग्न लवकर होत असत. त्यामुळे सर्व काही वेळेवर होत होतं. प्रत्येकाला आपापला पार्टनर भेटत होता. परंतु आज तरुण तरुणी 30व्या वर्षी लग्नात करतात. त्यामुळे हार्मोन्स खूपच अ‍ॅक्टीव होतात. त्यामुळे आपल्या खूप अस्वस्थ व्हायला होतं. म्हणून मुलांना सेक्ससाठी परवानगी देणं किंवा तसा सल्ला देणं पालकांचं कर्तव्य आहे.”

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच ती पंगा या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ती थलायवा सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

 

Visit : policenama.com