अभिनेत्री कंगना आज घेणार राज्यपालांची भेट

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेत्री कंगना राणौत आज साडेचार वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. राजभवन इथे ही भेट होणार आहे. कंगना विरूद्ध शिवसेना सामना रंगला असतानाच ती राज्यपाल यांची भेट घेत असल्यामुळे वेगळीच चर्चा रंगली आहे.

वादगृस्त ट्वीटमुळे कंगना आणि शिवसेना नेत्यांत गेली काही दिवस वाकयु्द्ध रंगले आहे. त्यात केंद्र सरकारने वाय दर्जा सुरक्षा दिली. त्यानंतर मुंबई महापालिकेन कंगना ऑफिसवर कारवाई केलीं. कारवाईनंतर कंगनाकडून शिवेसना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकेरी वक्तव्य केली. त्यावर सेनेकडून टीका झाली. त्यानंतर राज्यपाल यांनी केंद्र सरकारकडे कंगना प्रकरणात रिपोर्ट पाठवल्याच्या बातम्या समोर आल्या. पण त्यावर स्वत: राज्यपाल यांनी नकार दिला. त्यामुळे आता थेट कंगनाने राज्यपाल यांची भेटीची वेळ मागितली आहे. या आधी राज्यपाल यांनी अनेक मुद्दावर राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे. त्यामुळे आता कंगनाची भेट घेतल्याने पुन्हा एकदा ठिणगी पडणार असल्याची चर्चा आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like