ऑफिस अन् हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगनाचा राऊतांवर निशाणा, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री कंगना राणौत (kangana ranaut) आणि शिवसेना (shivsena) त्यांच्यातलं वाकयुद्ध गेल्या काही दिवसांपासून थांबलं होतं. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी कंगना प्रकरण आपल्यासाठी संपलं असल्याचे म्हटले होते. मात्र, आता कंगनानं राऊत यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे. कंगनानं दसऱ्यानिमित्त (dussehra) तिच्या मुंबईतल्या कर्यालयाचा फोटो ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे कंगनाला संजय राऊत कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी संजय राऊत आणि कंगना यांच्यामध्ये चांगलीच जुंपली होती. यानंतर आता दसऱ्याच्या मुहुर्तावर कंगनानं शुभेच्छा देताना संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे. कंगनानं ट्विटरवर हनुमानाच्या मूर्तीचा आणि मुंबईतल्या कार्यालयाचा फोटो शेअर केला आहे. माझी तुटलेली स्वप्नं तुमच्या चेहऱ्यासमोर हसत आहेत संजय राऊत. पप्पू सेना (pappu sena) माझं घर तोडू शकते. पण माझ्या आत्म्यावर घाला घालू शकत नाही. बंगला क्रमांक 5 आज सत्याचा असल्यावर विजय साजरा करत आहे, असे म्हणत तिने दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून संजय राऊत यांनी कंगनावर टीका केलेली नाही. कंगनाच्या मुंबईतल्या कार्यालयावर महापालिकेने कारवाई केल्यावर कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीवर घणाघाती टीका करण्यास सुरुवात केली. मात्र, संजय राऊत यांनी हा विषय संपल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून सगळ्या गोष्टींवर बोलेन, असं काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे आजच्या शिवसेना दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे कंगनावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

You might also like