कंगनाला Y+ सुरक्षा, जाणून घ्या X, Y, Z, Z+ सिक्युरिटीबाबत जी सरकारकडून दिली जाते

पोलीसनामा ऑनलाइन – भारतातील सुरक्षा स्तरांचे विविध स्तर झेड +, झेड, वाय +, वाय आणि एक्स आहेत. एसपीजीची सुरक्षा पंतप्रधानांसाठी असते. तसेच माजी पंतप्रधानांच्या कुटुंबांनाही एसपीजीची सुरक्षा असते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पाच वर्षे त्यासाठी पात्र असतात.

X स्तरीय सुरक्षा प्रणाली –
X लेव्हलची सुरक्षा व्यवस्थेत फक्त 2 सुरक्षा कर्मचारी असतात. या सुरक्षा व्यमस्थेत कमांडोजचा समावेश नसतो. यात पीएसओ ( Personal Security Officers- वैयक्तिक सुरक्षा अधिकारी) देखील असतो.

Y स्तरीय सुरक्षा प्रणाली –
Y लेव्हल सुरक्षा यंत्रणेत 11 सुरक्षा कर्मचारी असतात. या सुरक्षा व्यवस्थेत 1 किंवा 2 कमांडो आणि 2 पीएसओ देखील असतात. हे संरक्षण देशातील व्हीआयपींना दिले जाते.

Y+ स्तरीय सुरक्षा प्रणाली –
Y + सुरक्षा प्रणालीत पाच कर्मचारी असतात त्यात एक सीआरपीएफ कमांडर आणि चार कॉन्स्टेबल त्या व्यक्तीच्या निवासस्थानी असतात. तसेच ज्याला सुरक्षा दिली आहे त्या व्यक्तीसोबत सहा सुरक्षा अधिकारी असतात तीन शिफ्टमध्ये रोटेशनल पध्दतीवर त्यांना तैनात केलेलं असतं. याचा अर्थ असा की दोन पीएसओ नेहमीच संरक्षकांसमवेत असतात.

Z स्तरीय सुरक्षा प्रणाली –
Z सुरक्षा व्यवस्थेमध्ये राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) च्या 4 किंवा 5 कमांडर्ससह 22 सुरक्षा कर्मचारी असतात. या व्यक्तीस दिल्ली पोलिस किंवा सीआरपीएफकडून अतिरिक्त सुरक्षा पुरविली जाते. यात एस्कॉर्ट कारचा समावेश असतो. तसेच या सुरक्षा प्रणालीत कमांडो मशीन गन आणि दळणवळणाच्या आधुनिक माध्यमांनी सज्ज असतात. शस्त्रांशिवाय लढा देण्याचा अनुभवही त्यांना असतो.

Z+ सुरक्षा प्रणाली –
Z+ सुरक्षा प्रणालीत 36 सुरक्षा कर्मचारी असतात. या सुरक्षा प्रणालीत एनएसजीचे 10 कमांडो देखील असतात. हे कमांडो अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असतात. त्यांच्याकडे विविध प्रकारचे नवनवीन शस्त्रे असतात.