मेकअप आर्टिस्टवर बलात्कार केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगनाच्या बॉडीगार्डला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाचे अमिष दाखवून एका मेकअप आर्टिस्टवर बलात्कार केल्याप्रकरणी वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौतचा अंगरक्षक कुमार हेगडेला Kumar Hegde पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे. पिडित मेकअप अर्टिस्टने मुंबईतील डी. एन. नगर पोलिस ठाण्यात बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी (दि. 29) ही कारवाई केली आहे.

काय सांगता ! होय, व्हॅक्सीन सर्टिफिकेट शिवाय मिळणार नाही दारू, दुकानांवर लावले पोस्टर

डी. एन. नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि कुमार हेगडेची Kumar Hegde गेल्या वर्षी जूनमध्ये एका सिनेमाच्या चित्रीकरणावेळी भेट झाली होती. त्यानंतर त्यांची ओळख वाढली. कुमारने तिला लग्नाची विचारणा केली. लग्न करण्याचे अमिष दाखवून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तिला राहण्यास सांगितले. एकत्र राहत असताना कुमार हेगडेने महिलेसोबत शरिरसंबध ठेवले. तसेच आईची तब्येत खराब असल्याचे सांगत कुमारने महिलेकडून 50 हजार रुपये घेतले. ते परत केले नसल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यामुळे तक्रारदार महिलेने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्याला कर्नाटकातील मंडयाच्या हेगडाहळ्ळी येथून अटक केली आहे.

Also Read This : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’