बहुचर्चित ‘मणिकर्णिकाचे ट्रेलर रिलिज 

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

‘खूब लड़ी मर्दानी थी वो झाँसी वाली रानी थी वो’ हर हर महादेव असे जबरदस्त शब्द कानावर आले तर, अंगावर शहारे आणल्याशिवाय राहणार नाहीत. आता हे शहारे पुन्हा येणार आहेत ते, कंगना राणावतच्या बहुचर्चित मणिकर्णिका सिनेमाचा ट्रेलर बघुन. हो…कंगना राणावतच्या बहुचर्चित मणिकर्णिका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fe569190-c641-11e8-85a9-8de7e63e254b’]

‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट 19 व्या शतकातील झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे. 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यावेळी लक्ष्मीबाई यांचा ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीशी लढा या चित्रपटात दाखवला जाणार आहे.

 मागील अनेक महिन्यांपासून चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. क्रिश जगरलामुडी दिग्दर्शित ‘मणिकर्णिका’ चित्रपटाची निर्मिती कमल जैन आणि झी स्टुडिओने केली आहे. कंगनासोबतच निहार पांड्या, सोनू सूद या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात निहार दुसऱ्या बाजीरावांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट आधी 27 एप्रिल 2018 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र तो 3 ऑगस्ट 2018 रोजी रिलीज होईल असे सांगण्यात येत होते. मात्र आता हा सिनेमा आता 25 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.

देशातील ५ लाख गावं हागणदरीमुक्त : नरेंद्र मोदींचा दावा

या  चित्रपटासाठी कंगनाने खुप मेहनत घेतली आहे. तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी होऊन तिच्या डोक्याला 15 टाके ही पडले होते. या चित्रपटात लक्ष्मीबाई आणि एका ब्रिटीश व्यक्तीमध्ये प्रेमसंबंध दाखवल्याच्या आरोपावरुन वादाची ठिणगी पडली आहे.

जाहीरात