कंगणा राणावतचं नवं ट्विट; ‘मोदींना नेतृत्व करता येत नाही…मोदीजी, कृपया राजीनामा द्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत काहीना काही वक्तव्य करून चर्चेत असते. तिने देशातील घडामोडींवर यापूर्वी आपलं मत व्यक्त केले होते. पण आता तिने ‘मोदीजी, कृपया राजीनामा द्या आणि विष्णू अवतारातील एखाद्या ट्रोलरला पुढील पंतप्रधान बनवा’, असे म्हटले आहे.

कंगनाच्या अशाप्रकारच्या विधानांवरून सोशल मीडियावर तिच्यावर टीका केली जात आहे. मात्र, यावेळी तिने त्याच्यावर टीका करणाऱ्या नेटकऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘मोदींना नेतृत्व कसं करावं हे कळत नाही. कंगनाला अभिनय करता येत नाही. सचिनला बॅटिंग कशी करावी माहिती नाही आणि लता दीदींना गाता येत नाही. मात्र, या ट्रोलर्सना सगळं माहीत आहे’, असे ट्विट करत तिने युजर्सला ‘चिंदी’ असे म्हटले आहे. तसेच ‘मोदीजी कृपया राजीनामा द्या आणि विष्णू अवतारातील एखाद्या ट्रोलरला पुढील पंतप्रधान बनवा’, असेही म्हटले आहे.

https://twitter.com/AamirAshr/status/1386927927342690304

दरम्यान, कंगनाने समाचार घेतल्यानंतरही नेटकऱ्यांनी तिला पुन्हा सुनावले आहे. ‘व्वा शंभर टक्के खरंय…सचिन आणि लताजींबद्द्ल वगळता. त्यांचा समावेश करू नको. सचिनला क्रिकेट खेळता येतं आणि लताजींना गाता येतं. पण तू आणि मोदीजी उत्तम अभिनय जाणता, आपले पंतप्रधान एक लीडर नसून, उत्तम अभिनेते आहेत. तसेच ‘फक्त चमचेगिरी कर, देशासाठी काही मदत करू नको, किती पैसे दान केलेस तू, ट्विटरवर संताप दाखवून काही अर्थ नाही, असेही म्हटले आहे.