कंगनाच्या घरी लगीनघाई ! व्हिडीओ शेअर करत म्हणाली – ‘लग्नाच पहिलं निमंत्रण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेली अभिनेत्री कंगना राणौतच्या घरी लवकरच सनईचौघडे वाजणार आहेत. ही माहिती देत कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. एवढेच नाही तर हा व्हिडीओ चाहत्यांना खूप भावतो आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
बॉलीवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणौतने आपल्या सोशल मीडियावर लग्नाच्या तयारीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कंगना ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे. तीने साडी नेसली आहे आणि ज्वेलरी घातली आहे. कंगनाचा भाऊ अक्षतचे लग्न होणार आहे. त्यासाठी बधाईचा कार्यक्रम झाल्याचे कंगनाने सांगितले आहे.

https://www.instagram.com/kanganaranaut/?utm_source=ig_embed

कंगना म्हणाली, बधाई ही हिमाचल प्रदेशमधील परंपरा आहे. यामध्ये लग्नाचं सर्वात पहिलं निमंत्रण मामा-मामीला दिलं जातं. कंगनाच्या आईच्या माहेरी म्हणजे आजी-आजोबांकडे हा कार्यक्रम झाला. अक्षतचे लग्न नोव्हेंबरमध्ये होणार आहे. बधाईचा कार्यक्रम झाल्यानंतर आता सर्वांना निमंत्रण दिलं जाणार आहे.

https://www.instagram.com/kanganaranaut/?utm_source=ig_embed

कंगनाने हळदी सेरेमनीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात मोठी बहिण रंगोली चंडेलदेखील दिसत आहे. 2019 मध्ये अक्षतचा साखरपुडा झाला होता. ज्याचा फोटो व व्हिडीओ कंगनाने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. या व्हिडीओत दोन्ही बहिणी आपल्या वहिनीसोबत हिमाचलमधील ट्रेडिशनल डान्स करताना दिसत होत्या.

https://www.instagram.com/kanganaranaut/?utm_source=ig_embed