कंगणा राणावतच्या पोस्टरला चपलांचा ‘मारा’, शिवसेना महिला आघाडीने व्यक्त केला संताप

मुरबाड पोलीसनामा ऑनलाईन : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पोलिसावर आलेला ताण व त्यांची सततची धावपळ, स्वताच्या स्वास्थ्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते असते . कोरोना बाधीताशी देखील त्यांचा संपर्क येत असतो.आशा परिस्थिती कोरोनाशी दोन हात करून आपले कर्तव्य पारपाडत असतांना मुंबई पोलीसान बदल अपशब्द काढणाऱ्या कंगणा राणावत या नटीचा शिवसेने महिला आघाडी कडून मुरबाड मध्ये जाहीर निषेध करण्यात आला.

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत या अभिनेत्रीने केलेल्या ट्यूटर पोस्टचा विषय हा चर्चेचा बनला असून मुंबई सह महाराष्ट्र भर शिवसेना या पक्षाने तीच्या वक्ताव्याचा रस्यत्वार उतरून निषेध होत असतांनाच मुरबाड मध्येही आज शिवसेना आणि महिला आघाडी कडून निदर्शने करीत जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार,तालुका प्रमुख कांतीलाल कंटे,शहर अध्यक्ष राम दुधाळे,जिल्हापरिषद सदस्या रेखाताई कंटे,जिल्हा परिषद सदस्य प्राजक्ता भावार्ते ,पंचायत समिती सदस्य पदामा पवार ,योगिता शिर्के तालुका महिला संघटक, राम दळवी,धनाजी दळवी, मोहन भावार्थे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलतांना ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार म्हणाले की कंगणा राणावत या नटीने मुंबई पोलिसांन बदल काढलेल्या अपशब्द काढल्या बदल मुंबई पोलिसांन सह महाराष्ट्राची माफी मागावी या वेळी कंगणा रणावतच्या पोस्टर ला चपला मारून,घोषणा देत महिला शिवसेना संघटनेने निषेध व्यक्त केला