‘रेखा’चा फोटो शेअर करत कंगनाची बहिण रंगोली चंदेल म्हणाली – ‘अल्टीमेट बॅड गर्ल’

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार कंनगा रणौतची बहिण रंगोली चंदेल आपल्या बिंधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. ती नेहमीच कोणावर का कोणावर निशाणा साधताना दिसत आहे. अलीकडेच तिनं बॉलिवूमधील एव्हरग्रीन अ‍ॅक्ट्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेखावर निशाणा साधला आहे. रंगोलीनं रेखाचा एक जुना फोटो शेअर करत तिला बॅड गर्ल म्हटलं आहे.

रंगोलीनं ट्विटरवर राखीचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना रंगोली म्हणते, “रेखा बी टाऊनमधील अल्टीमेट बॅड गर्ल आहे. हे आठवून देण्यासाठी हा एक फोटोच पुरेसा आहे.” रंगोलीचं हे ट्विट पाहता पाहता सोशलवर व्हायरल होताना दिसलं. अनेकांनी यावर कमेंट केली आहे.

https://twitter.com/Rangoli_A/status/1247877932464234498

अनेक युजर्स तर असे आहेत ज्यांनी रेखाची तुलना कंगना रणौत सोबत केली आहे. एकानं कमेंट केली की, मला वाटलं हा कंगनाचा फोटो आहे. रेखा जी लिजेंड आहे. आणखी एक जण म्हणाला, पहिल्यांदा मला तर कंगनाच वाटली. कंगना रेखासोत खूप मिळती जुळती आहे.

एकानं तर असाही सल्ला दिला की, कंगना आणि रेखानं एकत्र एखादा सिनेमा करायला हवा. यात दोघींनी मायलेकीची भूमिका साकारावी.