कंगनाची ‘ही’ विनंती दिंडोशी कोर्टाने फेटाळली, जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही काळात अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली होती. यावरून राज्यात वाद उफाळला होता. या प्रकरणावरून गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधी अंधेरीतील महानगर दंडाधिकारी कोर्टात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला. यावरून या खटल्याला स्थगिती मिळावी अशी विनंती कंगनाने दिंडोशी कोर्टात केली आहे. यावरून कोर्टाने कंगनाची मागणी फेटाळून लावली. आणि खटल्याला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यावरून आता कंगनाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कंगनाने आरोप करत म्हणाली होती, बॉलीवूडमध्ये माफियाराज आहे असा उल्लेख केला होता. तर कंगनाने रिपब्लिक चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सुशांतसिंह राजपूत प्रकरणात गीतकार जावेद अख्तर यांचा उल्लेख केला आहोत. यावरून जावेद अख्तर यांनी माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना माझ्यावर खोटे आरोप कंगनाने केले आहेत. असे कंगनाविरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे.

जावेद अख्तर यांनी कोर्टाकडून मागणी करत म्हणाले, माझी विनाकारण मानहानी झाली असून मला प्रचंड मनस्ताप झाल्याने कंगनावर फौजदारी खटला चालवावा. तसेच IPC कलम ४९९ आणि ५०० अन्वये अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला. जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याप्रकरणी अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टाने कंगनाला नुकताच जामीन मंजूर केला आहे. मात्र कंगनाने काही दिवसांपूर्वी न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर राहून याप्रकरणी बजावण्यात आलेला वॉरंट रद्द करून घेतला होता. तर दिंडोशी कोर्टातील न्या. एस. यू. बगाले यांनी कंगनाची मागणी फेटाळून लावल्यामुळे कंगनाला आता उच्च न्यायालयात जावे लागणार आहे.