भाजपानं दिली होती तिकीटाची ऑफर, मात्र…., कंगनानं सांगितली Inside Story

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौंतनं चित्रपट क्षेत्रातील घराणेशाहीवर जोरदार टीका केली. नवीन लोकांना बॉलिवूडमध्ये संधी दिली जात नाही आणि स्टार किड्सना संधी दिली जाते, यावरून कंगनाने अनेक दिग्गज अभिनेते, प्रोड्यूसर आणि निर्मात्यांवर निशाणा साधला. एवढेच नाही तर तिने सुशांत प्रकरणात परखड मत व्यक्त करत मुंबई पोलीस आणि नेत्यांवर देखील टीका केली. त्यामुळे ती मागील काही महिन्यांपासून चर्चेत राहिली आहे.

या चर्चेदरम्यान तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन केले आहे. यावरून तिला ट्रोल करण्यात येत आहे. तिला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना तिने सडेतोड उत्तर दिली. कंगना म्हणते, मला राजकारणात यायचं आहे, म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत आहे, असे काही जणांना वाटत आहे. त्यामुळे ते मला ट्रोल करत आहेत. मी त्या सर्वांना सांगू इच्छिते की, माझे आजोबा 15 वर्षे काँग्रेसचे आमदार होते.

राजकारण्यांमध्ये माझे घर एवढे लोकप्रिय आहे की, गँगस्टर चित्रपटानंतर मला काँग्रेसकडून ऑफर मिळत होती, असे सडेतोड उत्तर कंगनाने ट्रोलर्सना दिले आहे. कंगणाने पुढे सांगितले की, मणिकर्णिकानंतर मला भाजपानेही तिकिट ऑफर केले होते. मात्र, माझं माझ्या कामावर प्रेम आहे. त्यामुळे राजकारणात जाण्याचा मी विचार करत नाही. मी राजकारणात जाण्याच्या प्रयत्नात आहे, असे ज्यांना वाटतं त्यांनी आता मला ट्रोल करणं थांबवावं, असे सांगत तिने ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच झापले आहे.