Kanguva Poster Out | सर्वत्र फक्त ‘कंगुवा’ चित्रपटाची चर्चा; पोस्टरने वेधले सर्वांचे लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन – Kanguva Poster Out | सध्या सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपटांची चर्चा आहे. चित्रपटाची थरारक कथा, कलाकरांचा उत्तम अभिनय यामुळे सर्वांनाच दाक्षिणात्य सिनेमांचे अक्षरशः वेड लागले आहे. आता आणखी एका दाक्षिणात्य सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगत आहे तो कंगुवा चित्रपट. या ‘कंगुवा’ चित्रपटाचे पोस्टर आऊट (Kanguva Poster Out) झाले आहे. यामुळे कंगुवा चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. सध्या सोशल मीडियावर कंगुवा चित्रपट ट्रेन्डिंगवर आला आहे.

दाक्षिणात्य चित्रपट ‘कंगुवा’ (Kanguva Movie) मध्ये सुपरस्टार सूर्या (Suriya Sivakumar) हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पोस्टरमध्ये फक्त नायकाचा हात दाखवण्यात आला आहे. या हाताला वेगळीच आभूषणे व टॅटू करण्यात आला आहे. तसेच हा भक्कम हातामध्ये मोठी तलवार देखील दाखवण्यात आली आहे. पोस्टरमध्ये चित्रपटाच्या टीझरची तारीख (Kanguva Teaser) देण्यात आली आहे. येत्या 23 जुलैला ‘कंगुवा’ चित्रपटाचा टीझर रिलीज (Kanguva Teaser Release Date) होणार आहे.

‘कंगुवा’ चित्रपटाचा पोस्टर आऊट (Kanguva Poster Out) होताच सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे.
यामध्ये अभिनेता सूर्या प्रमुख भूमिका साकारत आहे. एप्रिल महिन्यामध्ये त्याने या चित्रपटाशी निगडित एक व्हिडिओ पोस्ट केली होती. यामध्ये चित्रपटातील चित्तथरारक सीन दाखवण्यात आले होते. तेव्हापासून सूर्याच्या चाहत्यांमध्ये चित्रपटबाबत उत्सुकता आहे. यामध्ये सूर्या सोबतच अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) तसेच दाक्षिणात्य अनेक लोकप्रिय कलाकार काम करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक शिवा यांनी केले आहे. कंगुवा चित्रपट तमिळ भाषेमध्ये बनवण्यात येणार आहे. मात्र, डबिंग करुन तो पॅन इंडिया प्रदर्शित केला जाणार आहे.

Electricity Connections In Pune | नवीन वीजजोडणी, नादुरुस्त मीटर बदलासाठी मीटरचा तुटवडा नाही

Delhi Court grants regular bail to BJP MP Brij Bhushan in sexual harassment case

NCP Political Crisis | शरद पवारांना आणखी एक धक्का, ‘या’ राज्यातील 7 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा

Raigad Irsalwadi Landslide | पावसामुळे इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवलं ! 98 जणांना वाचवण्यात यश तर 16 जणांचा मृत्यू; NDRF ची माहिती