तुम्हाला नक्की आझादी कशापासून हवी ? ग्रामस्थांच्या प्रश्नाने कन्हैयाकुमार निरुत्तर

बेगुसराय : वृत्तसंस्था – आमच्या गावामध्ये द्रेशद्रोह्यांसाठी कोणतेही स्थान नाही असे म्हणत बेगुसराय मतदारसंघातील रामदीरी गावकऱ्यांनी सीपीआयच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे विद्यार्थी नेते कन्हैया कुमारला गावात येण्यास प्रचार प्रतिबंध केला असतानाच आता भारत तेरे तुकडे होंगे’ या घोषणाबाजीवरुन नागरिकांनी प्रश्न विचारले आहेत .या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

बेगुसरायमधील एका गावामध्ये रोड शो करण्यासाठी गेलेल्या कन्हैयाकुमार यांचा रस्ता अडवून स्थानिक गावकऱ्यांनी देशविरोधात घोषणाबाजी करण्यासंदर्भात अनेक प्रश्न विचारले. तुम्हाला कोणती आझादी हवी आहे? गरिबांना कोणतीही आझादी नकोय. तुम्ही आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाला १० टक्के आरक्षण देण्याला विरोध का केला ?’ असे प्रश्न विचारले. एका युवकाने कन्हैयाकुमार यांना ‘तुम्ही २०१६ मध्ये जेएनयूमध्ये भारत तेरे तुकडे होंगे’ अशी घोषणाबाजी का केली?’ असा प्रश्न कन्हैयाकुमार यांना केला. या प्रश्नाला उत्तर देताना कन्हैयाकुमार यांनी, ‘तू भाजपचा आहेस का?’ असा प्रतीप्रश्न विचारला. त्यावेळी तरुणाने नकार देत मी नोटाला मतदान करणार असल्याचे कन्हैयाकुमार यांना सांगितले. त्यानंतर मात्र कन्हैयाकुमार निरुत्तर झाले.

दिल्लीतील जेएनयूमध्ये ९ फेब्रुवारी २०१६ रोजी विद्यार्थी संघटनांनी देशविरोधी घोषणाबाजी केली होती. या संघटनेचं नेतृत्व कन्हैय्या कुमार यांनी केले होते. त्यानंतर त्याला १२ फेब्रुवारीला अटक केली होती. त्याच्याविरोधात १२४-अ (देशद्रोह) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये बिहारमधील बेगुसराय लोकसभेच्या जागेवरून सीपीआय उमेदवार कन्हैय्या कुमार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कन्हैया कुमार भाजपचे उमदेवार आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. कन्हैया कुमार यांच्या प्रचारासाठी अभिनेत्री स्वरा भास्कर, जिग्नेश मेवानी यांनी पुढाकार घेतला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like