कन्हैया कुमारांची झाली ‘पंचायत’, राष्ट्रगान गाताना घातला ‘गोंधळ’

पाटणा : वृत्तसंस्था – सिपीआय नेते आणि जवाहरलाल नेहरू विद्यार्धी संघाचे पूर्व अध्यक्ष कन्हैया कुमार गुरुवारी ‘संविधान बचाओ, नागरिकता बचाओ’ महारॅलीत सहभागी झाले होते. मात्र ही रॅली वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

या रॅली मध्ये व्यासपीठावर आलेल्या नेत्यांनी अनेकदा भाषेच्या अनेक मर्यादा ओलांडल्या, नंतर कन्हैया कुमार यांनी शेवटी भाषण केले. भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी कन्हैया कुमार यांनी लोकांना राष्ट्रगीत गाण्यासाठी विनंती केली.राष्ट्रगीत चालू असताना शेवटी दोन ओळीत कन्हैया कुमार यांनी जन गण मंगल’ च्या ऐवजी ‘जन मन गण’ गायले.

कन्हैया कुमार यांच्या समोर व्यासपीठावर एका ७ वर्षाच्या लहान मुलाने सध्या देशात चालू असणाऱ्या घटना बद्दल माहिती दिली. ते झाल्यानंतर त्या मुलाने नरेंद्र मोदी मुर्दाबाद अश्या घोषणा दिल्या, त्या मुलाने अश्या घोषणा दिल्यानंतर कन्हैया कुमार यांनी त्यामुलाला बोलवून मिठी मारली. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी ही या रॅलीत सहभागी होण्यासाठी आले होते, त्यांनी नागरिकत्व कायद्यची तुलना त्या तीन गोळ्यांशी केली, ज्या नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांच्या छातीत झाडल्या होत्या.