अभिनेत्री दीया मिर्झाच्या संसारात कनिक ढील्‍लननं घातला ‘बिब्बा’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतीच अशी घटना समोर आली आहे की, बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध सेलेब्रिटींचा संसार मोडल्याचे समजत आहे. अभिनेत्री दीया मिर्झा आणि कनिका ढिल्लन असे या सेलेब्रिटींची नावे आहेत. 5 वर्ष संसार केल्यानंतर दीयाने पती साहिल सांगापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे तर काही तासांनी रायटर कनिका ढिल्लननेही पती प्रकाश कोवेलामुडी सोबत आपला संसार मोडल्याचे सांगितले आहे.

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीया मिर्झाच्या घटस्फोटामागे कनिका ढिल्लन आहे अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. कनिका ढील्लनचे दीया मिर्झाचे पती साहिल सांगासोबत अफेअर आहे. त्यामुळेच दीयाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला अशी माहिती एका इंग्रजी वेबसाईटने दिली आहे. एका रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, दीया या अफेअरविषयी समजल्याने तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या निर्णयाबात दीयाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती त्यात तिने म्हटले होते की, “11 वर्ष एकत्र राहिल्यानंतर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे आम्ही दोघे नेहमी मित्र राहू. आमच्यात प्रेम आणि सन्मान कायमच राहिल. आमचे मार्ग वेगळे आहेत. मात्र आतापर्यंतच्या प्रवासासाठी आम्ही एकमेकांचे ऋणी आहोत.” 18 ऑक्टोबर 2014 रोजी दीया आणि साहिल विवाहबद्ध झाले होते.

View this post on Instagram

Happy Birthday precious one 💖

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on

कनिका ढिल्लनबाबत बोलायचे झाले तर 2 वर्षांपूर्वीच ती आपल्या पतीपासून वेगळी झाल्याचे तिने म्हटले आहे. प्रकाश आणि कनिका यांनी जजमेंटल है क्या या सिनेमात एकत्र काम केले आहे. प्रकाश यांनी सिनेमा दिग्दर्शित केला तर कनिकाने हा सिनेमा लिहिला आहे. प्रकाश आणि कनिका 2014 साली विवाहबंधनात अडकले होते.

आरोग्यविषयक वृत्त –