‘सिंगर’ कनिका कपूरचा खोटेपणा ‘उघड’, व्हायरल झाला हाय प्रोफाईल पार्टीचा फोटो !

पोलीसनामा ऑनलाइन – सिंगर कनिका कपूर हिनं सांगितलं होतं की, लंडनहून भारतात आल्यानंतर ती अवघ्या 30 लोकांच्या ग्रुपला भेटली असेल. यानंतर राजीव कपूर(कनिकाचे वडिल) यांनी स्पष्ट केलं होतं की, कनिका 3-4 पार्ट्यांना गेली होती. ज्यात किमान 400 लोक असतील. परंतु कनिकानं याचं खंडन केलं होतं. शुक्रवारी(दि 20 मार्च 2020) कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

https://www.instagram.com/p/B989G5wHlfr/?utm_source=ig_embed

सोशल मीडियावर व्हायरल झाला फोटो
अशात आता एक फोटो समोर आला आहे. कनिकाच्या हाय प्रोफाईल पार्टीचा हा फोटो आहे ज्यात कनिका कपूर, भाजप मंत्री दुष्यंत सिंह, त्यांची पत्नी निहारीका राजे, मुलगा विनायक सिंह जो 10 वीत आहे सोबतच उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री जयप्रताप सिंह यांची पत्नी वसुंधरा सिंह, अकबर डंपी यांचा पुतण्या आदिल अहमद आहे. जतिन प्रसाद यांची पत्नी नेहा प्रसाद आणि रामपूर नवाबच्या मुलीही दिसत आहेत.

एका इंग्रजी वृत्तानुसार, कनिका कपूर 15 मार्च 2020 रोजी या हाय प्रोफाईल पार्टीत सहभागी झाली. कालच(शुक्रवार दि 20 मार्च 2020) लखनऊच्या सरोजिनी नगर ठाण्यात कनिका विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. लखनऊ सीएमओ नरेंद्र अग्रवाल यांच्याकडून कनिका कपूर विरोधात आयपीसी कलम 188, 268, 270 नुसार केस दाखल करण्यात आली. रिपोर्टनुसार, 15 मार्च रोजी कनिका लंडनहून लखनऊला आली होती.