Corona Positive कनिका कपूर उपचारादरम्यान देखील दाखवतेय ‘नखरे’, वर्तणूकीमुळं हॉस्पीटलचा स्टाफ ‘हैराण-परेशान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर नुकतीच कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. लखनऊमध्ये झालेल्या एका पार्टीत ती सहभागी झाली होती. त्यानंतर या पार्टीत सामील झालेले लोक आइसोलेशनमध्ये गेले आहेत. दरम्यान, कनिकावर आपली प्रकृती लपवल्याचाहि आरोप होता. बॉलिवूडमध्येही बरेच लोक तिला पाठिंबा देत आहेत, तर काही लोकांनी तिला चांगलेच सुनावले आहे. कनिकावर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी कोरोना पॉझिटिव्ह कनिका कपूरबद्दल आणखी एक बातमी समोर येत आहे. कनिकाला ज्या रूग्णालयात दाखल केले गेले आहे, तिथला कर्मचारी वर्ग तिच्या नखऱ्यांमुळे हैराण आहे. स्वतः डायरेक्टरने पुढे येत कनिकाच्या वागण्याविषयी सांगितले आहे.

दरम्यान, कनिका कपूरवर लखनऊमध्ये उपचार सुरू आहेत. तिच्या वागण्यावरून रुग्णालय अस्वस्थ आहे. लखनऊ स्थित संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (SGPGI) च्या संचालकांनी कनिकावर आरोप केले की ती उपचारात सहकार्य करीत नाही. डायरेक्टरने सांगितले कि, कनिकाला सर्व आवश्यक आणि चांगल्या सुविधा पुरविल्या गेल्या आहेत. तिची आइसोलेशन रूम एयर कंडीशन असून त्यात शौचालय, पेशंट बेड, आणि टीव्ही आहे. तिला हॉस्पिटल कॅन्टीनमधून ग्लूटेन फ्री डाएट देण्यात येत आहे. हे सर्व असूनही, तिचे वर्तन चांगले नाही. तिचे नखरे सुरूच आहेत. ती रूग्णाऐवजी कर्मचाऱ्यासारखा व्यवहार करत आहे. यामुळे पीजीआय कर्मचारी अस्वस्थ आहेत.

तसेच, यापूर्वी कनिका कपूर यांनीही रुग्णालयावर आरोप केले होते. ती म्हणाली की, डॉक्टर धमकी देत आहेत कि, आपण मोठी चूक केली आहे.आपण टेस्ट न करता पळून गेलात. कनिका म्हणाली की, मी असे काहीही केले नाही. तिने सांगितले की, इथे खाण्यापिण्यासाठी काही नाही, पाणी नाही. मी अस्वस्थ आहे. ‘ दरम्यान, लंडनहून परतलेल्या कनिका कपूरवर कोरोना तपासणी न करता विमानतळ सोडल्याचा आरोप आहे. यानंतर तिने पार्ट्यांमध्ये हजेरी लावली. येथे ती बर्‍याच लोकांना भेटली. त्याच वेळी, पार्टीनंतर आणि तिचा तपास झाल्यानंतर तिची तब्येत बिघडली तेव्हा ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.