हॉस्पीटलमधून ‘डिस्चार्ज’ मिळालेल्या कनिका कपूरला सर्वात आधी करावं लागणार ‘हे’ काम ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड सिंगर कनिका कपूर कोरोनातून बरी झाल्यानंतर रविवारी(दि 5 एप्रिल 2020) सकाळी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. कनिकाला जरी डिस्चार्ज मिळाला असला तरी डॉक्टरांनी तिला एक काम करण्याचा सल्ला दिला आहे.

कनिका कपूर कोरोनावर मात करत सध्या घरी तर गेली आहे. परंतु डॉक्टरांनी मात्र तिला 14 दिवस सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळं घरी गेल्यानंतरही आता बाकीच्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी तिला दोन आठवडे सेल्फ क्वारंटाईनमध्ये रहावं लागणार आहे.

9 मार्च रोजी लंडनहून आली होती कनिका कपूर

कनिका कपूर 9 मार्च 2020 रोजी लंडनहून मुंबईत आली होती. यानंतर दोन दिवसांनी ती लखनऊला गेली होती. इथं तिनं पार्टी अटेंड केली होती. यावेळी ती 266 लोकांच्या संपर्कात आली होती. यांचाही शोध घेऊन कोरोना टेस्ट करण्यात आली. यातील 60 लोकांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटीव आला होता. 20 मार्च 2020 पासून कनिकावर उपचार सुरू होते. गेल्या 17 दिवसांपासून ती रुग्णालयात भरती होती.

https://www.instagram.com/p/B-LtIxRh4Zb/

14 दिवसांनंतर होणार कनिकाची चौकशी

लखनऊचे पोलीस कमिश्नर सुजीत पांडे यांनी एका वृत्त वाहिनीला बोलताना सांगितलं की, “14 दिवसांचा क्वारंटाईन संपल्यानंतर लखनऊ पोलीस कनिका कपूरची चौकशी करणार आहेत. त्यांनी सांगितलं की, कनिकाविरोधात सरोजिनी नगर मध्ये आयपीसीमधील कलम 188, 269 आणि 270 नुसार एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यामुळं पोलिसांची टीम तिची चौकशी करेल.”

https://www.instagram.com/p/B81PrpMhjTN/

कोरोनाबद्दल बोलायंच झालं देशात या व्हायरसमुळं अद्याप 109 लोकांचा मृत्यू झाला आहे. 4067 लोक या जावघेण्या कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. सुरक्षेसाठी देश 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊनमध्ये लागू केला आहे.

https://www.instagram.com/p/B6N210fBYCt/

https://www.instagram.com/p/B7vwUY5BpuB/

https://www.instagram.com/p/B5VVgNNhdON/

https://www.instagram.com/p/B187pYphRsL/