Kanjhawala Accident Case | अंजली सिंह अपघातप्रकरणी 2 पोलीस उपनिरीक्षक, 4 सहायक उपनिरीक्षक, 4 हेड कॉन्स्टेबल आणि 1 कॉन्स्टेबल निलंबीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Kanjhawala Accident Case | दिल्लीतील कांजवाला प्रकरणात 11 पोलिसांना तडकाफडकी निलंबित (Police Personal Suspended) करण्यात आले आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका या पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. ज्या मार्गावर ही घटना (Kanjhawala Accident Case) घडली त्या मार्गावर तैनात असलेल्या पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये 2 पोलीस उपनिरीक्षक (PSI), 4 सहायक उपनिरीक्षक (ASI), 4 हेड कॉन्स्टेबल आणि 1 कॉन्स्टेबलचा समावेश आहे. निलंबीत पोलिसांपैकी 6 पीसीआर ड्युटीवर तर 5 पोलीस शिपाई तैनात करण्यात आले होते. गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs) पोलिसांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांना कांजवाला प्रकरणातील (Kanjhawala Accident Case) पीआर व्हॅन, चेक पोस्टच्या पर्यवेक्षक अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यात हलगर्जीपणा झाल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. तर 11 पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष आयुक्त शालिनी सिंह (Special Commissioner Shalini Singh) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची (Inquiry Committee) स्थापना करण्यात आली होती. या चौकशी समितीला अहवाल सादर करण्यास सांगितले होते. समितीने अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने दिल्ली पोलिसांना (Delhi Police) या प्रकरणात लवकरात लवकर आरोपपत्र (Charge Sheet) दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून दोषींना शिक्षा करता येईल. तपासात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आणि तपासाच्या प्रगतीसंदर्भात पाक्षिक अहवाल गृह मंत्रालयाला सादर करण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अंजली सिंग या मुलीच्या स्कूटीला कारने धडक दिली.
या धडकेनंतर आरोपींनी कारमध्ये अडकलेल्या अंजलीला 12 किलोमीटर फरफटत नेलं.
यामध्ये गंभीर जखमी होऊन अंजलीचा मृत्यू (Anjali Singh Death Case) झाला.
याप्रकरणी कारमधील पाच जणांसह त्यांच्या आणखी एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title :- Kanjhawala Accident Case | delhi kanjhawala accident case 11 police personal suspended home ministry

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chitra Wagh | ‘…तर मग राठोडांना क्लिन चीट का दिली?’ चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल

Chandrakant Patil | पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली; म्हणाले – ‘आमचा कुठलाही देव…’

Navi Mumbai ACB Trap | सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी, तलाठ्यावर एसीबीकडून FIR