Kanjoos Makkhichoos Trailer | ‘कंजूस मक्खीचूस’चा ट्रेलर रिलीज; ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती

पोलीसनामा ऑनलाइन : ‘कंजूस मक्खीचूस’ (Kanjoos Makkhichoos Trailer) या आगामी चित्रपटामुळे बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कुणाल खेमू सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या 24 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चित्रपटाचा ट्रेलर (Kanjoos Makkhichoos Trailer) प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. या ट्रेलर मध्ये कुणाल हा एक कंजूष माणसाच्या भूमिकेत दिसत आहे.

या ट्रेलरमध्ये कुणाल खेमू सोबत श्वेता त्रिपाठी, पीयूष मिश्रा, अलका अमीन आणि दिवंगत कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत आहेत. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. नुकताच कुणालने सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत कॅप्शन मध्ये म्हटले की, “‘तो खूप कंजूष आहे. पण कुटुंबावरचे प्रेम दाखवण्यात कधीच कंजूषपणा करत नाही! कंजूस मक्खीचूसमध्ये जमनाप्रसाद पांडेची अनोखी कहाणी पहा’.

हा चित्रपट झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 24 मार्च रोजी रिलीज होणार आहे. आता चित्रपटाच्या ट्रेलर नंतर प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. कुणाल खेमूने चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करताच अनेकांनी यावर कमेंट देखील केले आहेत. “ट्रेलर मध्ये राजू श्रीवास्तव यांना पाहून छान वाटलं”, “आम्ही या चित्रपटाची वाट बघत आहोत” असे एक ना अनेक कमेंट सध्या या व्हिडिओवर पहायला मिळत आहे.

कुणाल खेमूच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास 1993 मध्ये ‘सर’ या चित्रपटातून कुणालने बालकलाकार
म्हणून काम केले. त्यानंतर त्याने गोलमान अगेन, गोलमाल-3, लूट केस, कलंक आणि मलंग या
चित्रपटामध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. एवढेच नाही तर त्याने अभय या
वेब सिरीजमधून देखील आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत.

Web Title :- Kanjoos Makkhichoos Trailer | kanjoos makhichoos trailer kunal khemu shweta tripathi movie

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Farhad Samji | दिग्दर्शक फरहाद सामजीने सतीश कौशिक यांच्यावर लिहिलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले “सतीश कौशिक ही अशी पहिली व्यक्ती…..”

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर

MP Supriya Sule | खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा