कन्नड अभिनेता बुलेट प्रकाश यांचं 44 व्या वर्षी निधन ! बंगळुरूमधील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

पोलीसनामा ऑनलाईन :कन्नड अभिनेता बुलेट प्रकाश यांचं आज बंगळुरूमध्ये निधन झालं आहे. त्यांना किडनीसंबंधित आजार होता. बुलेट प्रकाश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक निधनानं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार बुलेट प्रकाश यांना गेल्या काही दिवसांपासून किडनीशी संबंधित आजार होता. त्यांनी या जगाचा निरोप घेतला तेव्हा ते बंगळुरूमधील एका रुग्णालयात होते. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या निधनानं कन्नड फिल्म इंडस्ट्रीतही शोककळ पसरली आहे. अनेक कलाकार त्यांना सध्या सोशल मीडियावर दु:ख व्यक्त करताना दिसत आहेत.

बुलेट प्रकाश यांनी स्वत:च्या मेहनतीनं इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख तयार केली होती. कन्नड इंडस्ट्रीतील अनेक सिनेमात त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या निधनानं चाहतेही दु:खात बुडाल्याचं दिसत आहे. बुलेट प्रकाश 44 वर्षांचे होते. त्यांचा जन्म 2 एप्रिल 1976 रोजी बंगळुरूमध्ये झाला आहे. ज्या महिन्यात त्यांनी जन्म घेतला होता त्याचं महिन्यात त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

बुलेट प्रकाश यांनी आजवर अनेक सिनेमात काम केलं आहे. यात काही हिट सिनेमेही आहेत. मारी टायगर(2018), राजसिम्हा (2018), भूतयना मोमगा आयु(2018), इब्बारू बी टेक स्टुडेंट जर्नी (2019), जर्क (2019) असे त्यांचे काही अलीकडच्या काळातील सिनेमे सांगता येतील.