धक्कादायक ! 30 वर्षीय अभिनेता सुशील गोवडाची गळफास घेऊन आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रातून सतत वाईटच बातम्या समोर येताना दिसत आहेत. पुन्हा एकदा असंच काहीसं झालं आहे. टीव्ही अ‍ॅक्टर सुशील गोवडा यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुशीलनं होमटाऊन मंड्यामध्ये आत्महत्या केली आहे.

सुशील गोवडा 30 वर्षांचा होता त्यानं अनेक मालिकेत काम केलं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार सुशीलनं काल (दि 7 जुलै 2020) आत्महत्या केली आहे. सुशील अभिनेता तर होताच परंतु एक फिटनेस ट्रेनरही होता. कन्नड सिनेमात आपलं स्थान तयार करण्यासाठी सुशील खूप मेहनत घेत होता. आगामी Salaga या सिनेमात सुशील पोलिसाच्या रोलमध्ये दिसणार होता. ज्यात दुनिया विजय लिड रोलमध्ये आहे.

दुनिया विजयनं शेअर केली पोस्ट

सुशीलच्या निधनाची बातमी समोर येताच अॅक्टर दुनिया विजयनं पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. दुनिया विजयनं लिहलं की, जेव्हा मी त्याा पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा मला तो हिरो मटेरियल वाटला होता. सिनेमा येण्याआधीच तो आपल्याला सोडून गेलाय. समस्या काहीही असो आत्महत्या हे समाधान नाहीये. मला वाटतं की, या वर्षी हा मृत्यूचा सिलसिला थांबणार नाही. हे फक्त कोरोनामुळं नाहीये. लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमी आहे. त्यांची नोकरी जात आहे. आता मजबूत राहणं गरजेचं आहे जेणे करून यातून आपण बाहेर पडू.