१३ वर्षाच्या मुलाने ३७ व्यांदा लिहिले मोदींना पत्र ; केली ‘ही’ मागणी

कानपुर: वृत्तसंस्था – कानपूरच्या एका १३ वर्षीय मुलाने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून वडिलांची नाेकरी परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. मुलाचे नाव सार्थक त्रिपाठी असे आहे. सार्थकचे वडील विजय त्रिपाठी उत्तरप्रदेश स्टॉक एक्सचेंजमध्ये कर्मचारी होते. विजय त्रिपाठी यांना २०१६ मध्ये नाेकरीवरून कमी करण्यात आले होते.

 

 

आतापर्यंत सार्थकने ३७ पत्र मोदींना लिहिले आहेत. ३७ वे पत्र सार्थकने शुक्रवारी लिहिले आहे. यामध्ये त्याने विविध समस्या मांडल्या आहेत. त्याचबरोबरच वडिलांची नाेकरी गेल्यामुळे कुटुंबाला झालेल्या त्रासाची माहिती दिली आहे. सार्थकने पंतप्रधान मोदी यांना वडिलांना नाेकरी परत देण्याची मागणी केली आहे.

सार्थकने सांगितले की, मी मोदीजींना वडिलांना मदत करण्याची विनंती केली आहे.  माझ्या वडिलांना आणि माझ्या कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे.  जे माझ्या वडिलांसोबत चुकीचे वागले आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. तो म्हणाला की, मी पंतप्रधान मोदींविषयी खूप काही ऐकले आहे जसे की, ‘मोदी है तो मुमकिन है’ यांमुळे माझी विनंती आहे की त्यांनी माझ्या पत्राची दखल घ्यावी.