खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

पोलीसनामा ऑनलाइन – खासगी बस आणि टेम्पोच्या धडकेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील कानपूर- इटावा महामार्गावर मंगळवारी (दि. 8) रात्री साडे आठच्या सुमारास हा भीषण अपघात Kanpur Accident झाला आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी लाला लजपत राय रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात Kanpur Accident इतका भीषण होता की, टेम्पोचे अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.

 

 

कानपूरचे पोलीस आयुक्त असमी अरुण यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक खासगी बस उत्तर प्रदेशातील उन्नाव येथून गुजरातला जात होती.

त्यावेळी कामगार वाहतूक करणा-या एका टेम्पोने बसला पाठीमागून जबर धडक दिली. या अपघातात टेम्पोतील अनेक कामगार जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

यावेळी डॉक्टरांनी 10 जणांचा दाखल करण्याआधीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

तर 7 जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. इतर जखमींची अवस्थाही चिंताजनक आहे.

मृत आणि जखमी कामगार हे येथील बिस्कीटच्या कारखान्यातील कामगार आहेत.

कामगार टेम्पोने कामासाठी कारखान्यामध्ये जाताना हा अपघात झाला आहे.

हे सर्व कामगार कानापूर जिल्ह्यातील सचेंडी येथील असल्याचे समजते.

 

पंतप्रधान मोदी अन् मुख्यमंत्री योगीनी जाहीर केली मदत

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची दखल घेतली असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. हा अपघात कशामुळे झाला याची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीनी देखील या अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदींनी मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना राष्ट्रीय मदतनिधी मधून 2 लाख देण्याची घोषणा केली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

 

Also Read This : 

 

COVID-19 Vaccination | देशभरात 21 जूनपासून मोफत दिली जाणार कोरोनाची लस, जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरे

 

Weight loss : वजन कमी करण्यासाठी ‘जीम’ला जाऊ शकत नसाल तर OK; घरातील कामे करून देखील बर्न होतात कॅलरी, जाणून घ्या

 

धक्कादायक ! भाजप नेत्याचे मॉडेलसोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल