‘श्वेता-श्रेयम’ हत्या प्रकरणात 30 लाख रुपयांचं ‘कनेक्शन’, जाणून घ्या संपूर्ण स्टोरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कानपूरमध्ये राहणारी श्वेता आणि तिची लहान मुलगा श्रेयस यांच्या हत्येमागे तीस लाख रुपयांचा देखील संबंध होता. पोलिसांना क्लू देणाऱ्या या रकमेबाबतच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. एवढेच नाही तर श्वेताच्या भावाला पाठवण्यात आलेल्या मेसेज मध्ये काहीतरी अनर्थ होईल अशी चेतावणी लिहिण्यात आली होती.

श्वेता आणि तुमचे तीस लाख रुपये घेऊन जा
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे मॅनेजर रोहित तिवारी यांच्या खुनी मित्राने श्वेताच्या मोबाईल वरून मेसेज पाठवून तीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती. दोन दिवस आधी रोहितने देखील आपले सासरे सुरेश मिश्रा यांना फोन करून सांगिलते होते की, येऊन तुम्ही लग्नात खर्च केलेले तीस लाख रुपये आणि तुमची मुलगी घेऊन जा. तीस लाख या रकमेच्या संख्येने देखील पोलिसांना मोठा सुगावा मिळाला. सात जानेवारीला श्वेताची हत्या झाल्यानंतर आणि अपहरणाचा तपास लागताच सर्वोदय नगर येथे राहणारे सेवानिवृत्त वडील सुरेश मिश्रा, पत्नी माधुरी आणि मुलगा शुभम समवेत जयपूरला रवाना झाले.

आठ जानेवारीला सकाळी जेव्हा ते पोहचले तेव्हा समजले की, रोहितच्या मोबाईलवर तीस लाखांच्या खंडणीचा मेसेज आला होता. त्यांनी रोहित वरच हत्या केल्याचा आरोप लावला. कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, रोहितने पाच जानेवारीला फोन करून सांगितले होते की, श्वेताला आता ठेवायचे नाही, तुम्ही इकडे येऊन तुमचे तीस लाख रुपये आणि श्वेताला घेऊन जा. यानंतर पोलिसांनी रोहितला ताब्यात घेतले आणि सीसीटीव्हीच्या मदतीने खुनी सौरभ उर्फ राज सिंह चौधरी यांच्यापर्यंत पोहचले जो की रोहितच्या मित्राचा मेव्हणा हरी सिंह होता.

काय आहे नेमके प्रकरण
जयपूर येथील जगतपूरा मधील आयओसीचे मॅनेजर रोहित तिवारीची 30 वर्षीय पत्नी श्वेता आणि 21 महिन्यांचा मुलगा श्रेयसची सात जानेवारीला हत्या करण्यात आली होती. खुन्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी श्रेयसच्या अपहरणाचे नाटक रचले होते. सायंकाळी नोकराणीच्या येण्याने घटनेबाबत समजले तेव्हा रोहितच्या मोबाइलवर मेसेज पाठवून तीस लाखांची खंडणी मागितली होती. 22 तासानंतर मुलाचा मृतदेह जंगलात मिळाला होता. पोलिसांनी 10 जानेवारीला रोहित आणि सौरभला अटक करून याबाबतचा खुलासा केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –