मोठ्या बहिणीला भिती दाखवण्याच्या नादात गेला लहान भावाचा जीव, घटना पाहून गावकरी झाले ‘स्तब्ध’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बहीण भावाचे नातं हे खूप खास असतं. एकमेकांच्या खोड्या काढणं याशिवाय तर कोणत्याच बहीण-भावच नातं पूर्णच होऊ शकत नाही. कानपूरमधल्या एका भाऊ आणि बहिणीमधल्या साध्यासुध्या भांडणात भावाचा जीव गेला. शनिवारी रात्री बिधानू हराहा गावात बीएससीच्या विद्यार्थ्याने आपल्या मोठ्या बहिणीला भीती दाखवायच्या नादात स्वतःचे प्राण गमावले. ही घटना पाहून ग्रामस्थ स्तब्ध झाले, तर रुग्णालयात डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केल्याने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. भावाच्या मृत्यूनंतर बहीण स्वतःला दोषी मानू लागली आणि रडून रडून बेजार झाली. पोलीस चौकशीसाठी गावात पोहचले असता ही घटना अचानक झाल्याचे पोलिसांना सांगण्यात आले.

18 वर्षाचा मुलगा दिग्विजय हा बीएससीचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. काही दिवसांपूर्वी तो वडिलांकडून मोबाईल खरेदी करून घेऊन आला आणि बर्‍याचदा कुणाशी तरी बोलत असायचा. त्याची मोठी बहीण त्याला अभ्यास करायला सांगायची. शनिवारी रात्री त्याची बहीण सुप्रियाने त्याचा मोबाइल घेतला. थोड्या वेळाने, दिग्विजयने आपल्या बहिणीला आपला मोबाइल परत करण्यास सांगितले आणि तिने नकार दिला.

मोबाइल न दिल्याबद्दल दिग्विजयने बहिणीला घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला स्वतःला फाशी लावून घेण्याची धमकी दिली आणि ओढणीला फास बनवला आणि तो पंख्याला लटकावला. यानंतर, त्याने आपल्या बहिणीला घाबरवायला फाशी घेईन असे सांगून अचानक तो लटकला. त्याला पाहून बहिणीला धक्काच बसला. ती मोठ्याने ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि शेजारी गोळा झाले. त्याला फासावरून उतरवून जवळच्या इस्पितळात नेण्यात आले. डॉक्टरनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ही घटना ऐकून पूर्ण गावातच शोककळा पसरली. तर बहीण यासाठी स्वत:ला दोषी मानू लागली. मोबाईलबाबत बहिणीशी झालेल्या भांडणानंतर विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा प्रकार समोर आल्याचे पोलीस स्टेशन प्रभारी देवेंद्र सिंह यांनी सांगितले

फेसबुक पेज लाईक करा –

 

You might also like