नोकरीच्या अमिषानं व्यावसायिकाकडून युवतीवर हॉटेलमध्ये ‘बलात्कार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दहावीची  तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीला नोकरीच्या बहाण्याने हॉटेलवर बोलावून एका व्यावसायिकाने तिच्यावर बलात्कर केल्याची घटना कानपूरमध्ये समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला याप्रकरणी अटक केली आहे.

महोबा येथील रहिवासी असलेली हि २२ वर्षीय युवती येथील एका भाड्याच्या खोलीत राहत असून ती एका परीक्षेची तयारी करत आहे. काही वर्षांपूर्वी तिची भेट येथील एक व्यावसायिक हरीश चंद्र पांडे याच्याबरोबर झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मोबाईलवर आणि व्हाट्सअप वर संभाषण होत असे. या तरुणीने आरोप केला आहे कि, कॉल सेंटरमध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने त्याने हा बलात्कार केला. मंगळवारी त्याने कॉल सेंटरच्या संचालकाशी  बोलण्याच्या बहाण्याने मला एका ठिकाणी बोलावले. त्यानंतर त्याच्या कारमधून तो मला एका हॉटेलमध्ये घेऊन आला. त्यानंतर पेयामध्ये बेशुद्धीचे औषध देऊन माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिने पोलिसांत येऊन त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

दरम्यान, पोलिसांनी तरुणीच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा  दाखल केला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे. त्याचबरोबर तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –