कानपुर गोळीबार प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT ची स्थापन, 31 जुलैपर्यत द्यावा लागेल रिपोर्ट

लखनऊ : कानपुर गोळीबाराच्या चौकशीसाठी आता एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. कानपुरमध्ये आठ पोलीस कर्मचार्‍यांची गँगस्टर विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी हत्या केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अपर मुख्य सचिव संजय भूसरेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटीला या महिन्याच्या अखेरपर्यंत तपास पूर्ण करून रिपोर्ट शासनाला द्यायचा आहे.

संजय भूसरेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील या एसआयटीमध्ये अपर पोलीस महासंचालक हरिराम शर्मा आणि पोलीस उप महानिरीक्षक जे. रवींद्र गौड यांचाही समावेश आहे. एसआयटीद्वारे घटनेशी संबंधाती विविध प्रकरणांची चौकशी केली जाईल. सोबतच 31 जुलै 2020 पर्यंत एसआयटीला चौकशी अहवाल शासनाला सादर करावा लागेल.

एसआयटीद्वारे विकास दुबे आणि पोलीसांच्या संबंधासह त्याच्यावर अजूनपर्यंत अ‍ॅक्शन का घेतली नाही, इत्यादी कारणांची चौकशी केली जाईल. याशिवाय विकास दुबेच्या एक वर्षाच्या कॉल रेकॉर्डची सुद्धा चौकशी केली जाईल. विकास दुबेच्या विरूद्ध आतापर्यंत जेवढी प्रकरणे होती, त्यावर किती प्रभावी कारवाई केली गेली, याचीही चौकशी करण्यात येईल.

याशिवाय विकास दुबेविरूद्ध आलेल्या तक्रारींवर पोलीस ठाणे प्रमुख चौबेपुर आणि जनपदच्या अन्य अधिकार्‍यांकडून कोणती कारवाई करण्यात आली, याचा रिपोर्टसुद्धा सोपवावा लागणार आहे. सोबतच विकास दुबे आणि त्याच्या जोडीदारांच्या संपर्कात आलेल्या सर्व पोलीस कर्मचार्‍यांविरोधात पुरावे मिळाल्यानंतर कठोर कारवाईचे निर्देश सुद्धा देण्यात येतील.

घटनेच्या दिवशी आरोपींकडे जी शस्त्र होती, त्याबाबत मिळालेल्या सूचनेकडे कोणत्या प्रकारे दुर्लक्ष केले गेले, आणि पोलीस ठाण्यात याबाबत पूर्ण माहिती होती किंवा नाही, याबाबत सुद्धा एसआयटी चौकशी करून दोषींचा शोध घेणार आहे.

एसआयटीद्वारे या प्रश्नांची होणार चौकशी

-विकास दुबेवर जेवढी प्रकरणे दाखल होती, त्याचा योग्य तपास झाला होता किंवा नाही. विकास आणि त्याच्या साथीदारांना शिक्षा देण्यासाठी योग्य अ‍ॅक्शन घेतली किंवा नाही.

-विकासचा गुन्हेगारी इतिहास पाहता त्याचा जामीन रद्द व्हावा यासाठी काही अ‍ॅक्शन घेण्यात आली होती किंवा नाही.

-चौबेपुर पोलीस ठाण्यात विकास दुबेच्या विरोधात किती तक्रारी आल्या होत्या आणि कोणती अ‍ॅक्शन घेतली गेली.

-एसआईटी विकास दुबेच्या फोन कॉलची सीडीआर काढेल आणि चौकशी करेल. एक वर्षात जेवढे पोलीस त्याच्या संपर्कात होते, त्यांची चौकशी होणार. दोषी आढणार्‍यांवर कारवाई केली जाईल.

-विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांवर प्रकरणे दाखल असूनही त्यास शस्त्र परवाना कसा मिळाला, कुणी दिला? सतत क्राइम करत असतनाही लायसन्स रद्द का नाही झाले आणि शस्त्र त्याच्याकडे कसे ठेवले, याचीही चौकशी होणार आहे.

-विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांच्या प्रॉपर्टीची चौकशी होणार आहे, तसेच आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार आहे. स्थानिक पोलीसांनी याबाबत कोणती बपर्वाई केली, का ते सामिल होते, याचीही चौकशी केली जाणार आहे.

-विकास दुबेने किती अवैध सरकारी, गैर सरकारी जमीन बळकावली होती, याचीही चौकशी केली जाईल. यामध्ये सहभागी अधिकार्‍यांची देखील चौकशी होईल.