ब्लड प्रशेरच्या त्रासाला कंटाळून पतीने पत्नीवर झाडली गोळी, पुढं…

कानपूर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एक धक्कादायक घटना घडली असून कानपूरच्या देहात येथे एका खोलीत पती-पत्नीचा मृतदेह आढळला आहे. मृतदेहा शेजारी एक लायसन्स रायफल होती. या बंदुकीने गोळ्या जाडून जोडप्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पत्नी उच्च रक्तदाबाची रुग्ण होती.

गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत वाद होत होते. पतीने गोळी झाडून आधी पत्नीला मारले, त्यानंतर स्वत: जीव घेतला आणि आयुष्य संपवले. शेजार्‍यांनी गोळ्यांचा आवाज ऐकून, या जोडप्याचे घर गाठले. त्यानंतर दोघांना मृत अवस्थेत पाहून लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. जोडप्याचे शव पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अद्याप कोणतीही सुसाइड नोट पोलिसांना सापडलेली नाही आहे. पती – पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणात अधिक चौकशी करत आहे.