कानपुर हत्याकांड : शहीद पोलीस कर्मचार्‍यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये खुलासा, देवेंद्र मिश्रांना मारल्या 4 गोळ्या, नंतर कापले पाय

कानपुर : वृत्त संस्था – चौबेपुरच्या बिकरू नर हत्याकांडात शहीद पोलीस कर्मचार्‍यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा झाला आहे. रिपोर्टनुसार, सर्वांची अतिशय निर्घृणपणे त्या करण्यात आली होती. हत्येसाठी धारदार शस्त्रांचाही वापर करण्यात आला होता. संबंधित पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाल्याचे एका न्यूज चॅनल ने म्हटले आहे. यामध्ये म्हटले आहे की, शहीद सीओ देवेंद्र मिश्र यांना पॉईंट ब्लँक रेंजमधून 4 गोळ्या मारण्यात आल्या होत्या. तीन गोळ्या त्यांच्या शरीरातून आरपार गेल्या होत्या. याशिवाय त्यांचे पायसुद्धा कापले होते.

येथे मारल्या होत्या गोळ्या
पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, शहीद सीओ देवेंद्र मिश्रा यांच्या डोक्यात, छातीत आणि दोन गोळ्या पोटात मारण्यात आल्या होत्या. सर्व गोळ्या अतिशय जवळून मारण्यात आल्या होत्या, ज्यामुळे तीन गोळ्या त्यांच्या शरीरातून आरपार गेल्या होत्या. एक गोळी डोक्यात अडकल्याचे दिसून आले. एवढे नव्हे, गुन्हेगारांनी धारधार शस्त्रांचा वापर करत त्यांचे पाय सुद्धा तोडले होते.

तीन पोलीस कर्मचार्‍यांच्या डोक्यात आणि चेहर्‍यावर लागली गोळी
बिकरू नर हत्याकांडाचे भीषण चित्र समोर आले आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, तीन पोलीस कर्मचार्‍यांचा चेहरा आणि डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. सर्वांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून हे स्पष्ट झाले आहे की, पोलीस कर्मचार्‍यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

मास्टरमाइंड विकास दुबेसह 6 जण एन्काऊंटरमध्ये ठार
8 पोलीस कर्मचार्‍यांची हत्या करण्यात आल्यानंतर पोलिसांनी मास्टरमाइंड विकास दुबेसह त्याच्या टोळीतील सहा गुन्हेगारांचा एन्काऊंटर केला आहे. याशिवाय डझनभर गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणात 21 लोकांविरूद्ध एफआयआर दाखल केले आहे. मात्र, विकास दुबेच्या एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे. सोबतच एक सदस्यीय चौकशी आयोगसुद्धा स्थापन करण्यात आला आहे, जो दोन महिन्यात आपला रिपोर्ट सोपवणार आहे.