Kanpur News | संतापजनक ! दलित रुग्णाला जात विचारत बेदम मारहाण, टोळक्याचा तरुणाच्या गुप्तांगावर मारहाण (व्हिडिओ)

कानपूर : वृत्तसंस्था – एका दलित तरुणावर झालेल्या अत्याचाराचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथील हा व्हिडिओ (Viral Video) असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कानपूर (Kanpur) येथी देहात येथील व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक दलित तरुणाला त्याची जात विचारताना दिसत आहेत. दलित युवकाने जात सांगताच त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्याच्या गुप्तांगावर काठीने मारहाण केली. यामध्ये जखमी झालेल्या युवकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. Kanpur News dalit man was brutally beaten for talking to girl in kanpur district

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

एका आरोपीला अटक
तरुणाला जात विचारुन बेदम मारहाण केल्याचा प्रकार पोलिसांना (Police) समजाता पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन एका आरोपीला अटक केली आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, तरुणाला जात विचारली जात आहे, तरुणाने जात सांगताच त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला काठीने अमानुष मारहाण केली. एवढचं नाही तर त्याच्या गुप्तांगावरही वार केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

प्रेम प्रकरणातून तरुणाला मारहाण
ही घटना दोन दिवसांपूर्वी कानपूर देहात मधील अकबर पुर ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
प्रेम प्रकरणातून तरुणाला मारहाण केल्याचे बोलले जात आहे.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेत एकाला अटक केली.
पोलिसांनी सांगितलं की, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला.
एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
व्हिडिओत आणखी दोन जण तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत.
त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. आरोपींना अटक करण्यासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. पीडित तरुणावर कानपूरच्या हॅलट रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title : Kanpur News dalit man was brutally beaten for talking to girl in kanpur district

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Vinayak Raut | ‘नारायण राणेंना पंतप्रधान केले, तरी शिवसेनेला दु:ख वाटण्याचे कारण नाही’

Social and Political Agitation Cases | सामाजिक, राजकीय आंदोलनातील डिसेंबर 2019 पुर्वेचे खटले मागे घेण्याचा सरकारचा निर्णय, समिती स्थापन

MP Vinayak Raut | ‘नारायण राणेंना पंतप्रधान केले, तरी शिवसेनेला दु:ख वाटण्याचे कारण नाही’