Kanpur News | अबब ! रस्त्याच्या कडेला पान, चाट आणि समोस्याची विक्री करणारे 256 लोक निघाले ‘करोड’पती, आयकर आणि GST तपासणीत माहिती उघड

कानपूर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर शहर (Kanpur News ) गुन्हेगारीच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असते. मात्र आता आणखी एका गोष्टीमुळे कानपूर शहर (Kanpur News) चर्चेत आले आहे. कानपूरमध्ये रस्त्याच्या कडेला पान, चाट आणि समोस्याची गाडी लावणारे विक्रेते (selling paan, chaat and samosas) कोट्याधीश (millionaires) असल्याची बाब समोर आली आहे. गल्ली बोळात छोटे-छोटे दुकानांचे मालक, किराणा मालाचे दुकानदार, औषध विक्रेते करोडपती आहेत. रस्त्याच्या कडेला फळ विक्री करणाऱ्यांकडे शेकडो बिघा शेतजमीन आहे. आपल्याकडे फक्त एक कार असू शकते परंतु या लोकांकडे तीन-तीन अलिशान गाड्या आहेत. मात्र हे लोक ना आयकर (Income tax) भरतात ना जीएसटीच्या (GST) नावावर एक पैसा देतात. बिग डेटा सॉफ्टवेअर (Big data software), आयकर विभाग आणि जीएसटी नोंदणीच्या तपासात 256 लोक करोडपती असल्याची बाब समोर आली आहे.

आयकर विभागाकडून गुप्त नजर
हे लोक दिसायला गरीब दिसत असले तरी ते श्रीमंत आहेत. अशा लोकांवर आयकर विभाग गुप्त नजर ठेऊन होता. केवळ आयकर भरणा आणि परतावा भरणाऱ्या करदात्यांची देखरेख करण्याशिवाय, विभाग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पैसे कमवणाऱ्या अशा व्यापाऱ्यांची माहिती सतत गोळा करत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गुप्त करोडपतींना पकडण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

375 कोटींची मालमत्ता खरेदी
या व्यापाऱ्यांनी जीएसटी नोंदणी बाहेरील एक पैसाही भरला नाही. मात्र चार वर्षात 375 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी (Property purchase) केली आहे. ही मालमत्ता आर्यनगर, स्वरुप नगर, बिरहाना रोड, पिरोद, गुमटी सारख्या अत्यंत महागड्या व्यावसायिक परिसात खरेदी केल्या आहेत. याशिवाय दक्षिण कानपूरमध्ये (South Kanpur) निवासी जमीन खरेदी केली आहे. तसेच 30 कोटींपेक्षा जास्त किंमतीची केव्हीपी खरेदी केली. हे लोक 650 बीघा शेतजमिनीचे मालक देखील बनले आहेत. या लोकांनी कानपुर नगर, नरमाऊ, काकवण, बिठूर, मंधाना, सरसौल ते फारुखाबाद या ग्रामीण भागात त्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत.

 

पान दुकानदाराकडून 5 कोटींची खरेदी

कोरोना काळात सर्व व्यवसाय ठप्प असताना पान दुकानदारांनी तब्बल पाच कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. ही मालमत्ता आर्यननगर मधील 2, स्वरुप नगर मधील 1 आणि बिरणा रोड येथील 2 पान दुकानदारांनी ही मालमत्ता खरेदी केली आहे. मालरोड रोडवर खस्ता विकणारा वेगवेगळ्या गाड्यांवर दरमहा सव्वालाख रुपये भाडे देत आहे. तर दोघांनी इमारती खरेदी केल्या आहेत. लालबंगला येथील एक आणि बेकणगंज येथील दोघांनी दोन वर्षात 10 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या मालमत्ता खरेदी केल्या आहेत. बिरहणा रोड, पी रोड, मॉल रोडच्या चाट व्यापाऱ्यांनी जमिनीमध्ये कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जीएसटी नोंदणीबाहेरील किरकोळ व्यापारी आणि औषध विक्रेत्यांची संख्या 65 पेक्षा जास्त आहे. ज्यांनी कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे.

असा झाला खुलासा
प्राप्तिकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,
ज्यावेळी बरेच उत्पन्न वाढते तेव्हा प्रत्येक माणूस गुंतवणूकीचा मार्ग शोधत असतो.
फेरीवाले, पान ठेला वाल्यांची जीवनशैली अतीशय साधी असते.
त्यामुळे त्यांचा खर्च मर्यादीत असतो आणि बचत मोठी असते.
हा पैसा कोणत्याही विभागाच्या नजेत येऊ नये यासाठी त्यांनी चलाखी केली.
विभागाच्या नजरेतून वाचण्यासाठी त्यांनी सहकारी बँकेत खाते उडले.
या मालमत्तेत बहुतांश गुंतवणूक भाऊ, मेव्हणी, काका, मामा आणि बहिण यांच्या नावावर खरेदी केल्या.
परंतु पॅनकार्ड स्वत:चे जोडले.
केवळ एकाच मालमत्तेत पॅनकार्ड (PAN card) आणि आधार (Aadhaar card) मिळताच त्यांचा भांडाफोड झाला.

Web Title :- Kanpur News | income tax and gst scrutiny 256 chaat and paan vendors turned out to be millionaires

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

KCC-Kisan credit card | शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! 2 दिवसात करा ‘हे’ काम, अन्यथा किसान क्रेडिट कार्डमधून कापले जातील पैसे; जाणून घ्या

Aadhaar Virtual Id | प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही, मिनिटात बनवा व्हर्च्युअल आयडी आणि करा आवश्यक कामे

Extortion Case Against IPS | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 6 जणांवर खंडणीचा आणखी एक गुन्हा, 2 कोटींचं प्रकरण