कमलेश तिवारी मर्डर केस : मारेकर्‍यांना पिस्तुल पुरवणार्‍या युसूफ खानला कानपुरमधून अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कमलेश तिवारी हत्याकांड प्रकरणात उत्तरप्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाला मोठे यश हाती लागले आहे. उत्तरप्रदेश एटीएसने कानपूरमधून युसूफ खान नावाच्या व्यक्तीला असून या हत्या प्रकारात हत्यारांना पिस्तूल पुरवण्याचे काम केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मागील महिन्यात 18 तारखेला कमलेश तिवारी यांची त्यांच्या राहत्या घरी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

सुरतमध्ये दिली होती बंदूक
उत्तरप्रदेशमधील हथगांव फतेहपुरचा रहिवासी असलेला युसूफ खान मागील काही काळापासून गुजरातमधील सुरत येथे वास्तव्यास होता. त्यावेळी अशफाक आणि मोईनुद्दीन यांनी बंदुकीसाठी त्याच्याकडे संपर्क साधला असता त्याने दोघांना बंदूक पुरवली होती. त्यानंतर तपासात त्यानेच पुरवलेली बंदूक हत्येसाठी वापरण्यात आल्याचे उघड झाले होते.

दोन मोबाईल जप्त
शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईल फोन देखील जप्त केले. त्याचबरोबर पोलीस त्याला न्यायालयासमोर हजार करणार असून त्याला पोलीस कोठडीची मागणी करणार असून त्याच्याकडे आणखी कसून चौकशी केली जाणार आहे. त्याआधी गुरुवारी पोलिसांनी नावेद नावाच्या आरोपीचा साथीदार कामरान याला अटक केली होती. त्याच्यावर आरोपींना नेपाळला जाण्यास मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

दोन्ही आरोपीचे जबाब तपासले
या दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर नावेद आणि त्यांच्या जबाबाला क्रॉस चेक करण्यात आले. आरोपींना नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच असीमच्या अटकेनंतर आरोपींना नेपाळवरून पुन्हा शाहजहांपुरला आणण्याचा देखील आरोप आहे.

मौलाना कैफी याने दिली जागा
नावेद आणि मौलाना कैफी कि या दोघांवर मुख्य आरोपींना राहण्यास जागा देण्यास तसेच त्यांची मदत करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तिवारी यांच्या हत्येनंतर फरार झालेल्या दोन्ही आरोपींना मौलाना कैफी याने मोठी मदत केली होती.

 

Visit : Policenama.com 

हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु, योग्य वापर करा, होऊ शकतो दुष्परिणाम
बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
 जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
 ‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार