कानपुर शूटआऊट : गँगस्टर विकास दुबेच्या संपर्कात असलेल्या 2 वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह तिघे तडकाफडकी निलंबीत

कानपूर : कानपूर शूटआऊट प्रकरणात अतिशय महत्वाचा खुलासा झाला आहे. सराईत गुन्हेगार विकास दुबेच्या संपर्कात चौबेपुर पोलीस ठाण्याचे दोन निरीक्षक आणि एक पोलीस कर्मचारी होते. त्यांच्या कॉल डिटेल्समधून हा खुलासा झाला आहे. यानंतर निरीक्षक कुंवर पाल आणि कृष्ण कुमार शर्मासह कॉन्स्टेबल राजीव यांना एसएसपीने सस्पेंड केले आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

रविवारी विकास दुबेचा निकटवर्तीय दयाशंकर अग्निहोत्री पकडला गेला होता. त्याने कबूल केले की, विकास दुबेनेच पोलिसांवर गोळ्या चालवल्या. दयाशंकरने सांगितले की, रेडची बातमी विकासला पोलीस ठाण्यातून समजली होती, ज्यानंतर विकासने 25-30 लोकांना बोलावले होते. हे सर्व लोक शस्त्रधारी होते.

निकवर्तीयाच्या खुलाशानंतर शोधले कॉल डिटेल्स
या खुलाशानंतर पोलिसांनी पोलीस कर्मचार्‍यांची चौकशी सुरू केली होती, जे विकास दुबेच्या संपर्कात होते. चौबेपुर पोलीस ठाण्याच्या सर्व पोलीस कर्मचार्‍यांचे कॉल डिटेलस तपासण्यात आले. कॉल डिटेल तपासात असताना खुलासा झाला की, चौबपुरचे तीन पोलीस कर्मचारी विकास दुबेच्या संपर्कात होते.

यांनतर एसएसपीने आरोपी पोलीस निरीक्षक कुंवर पाल आणि कृष्ण कुमार शर्मा यांच्यासह कॉन्स्टेबल राजीव यांना सस्पेंड केले आहे आणि त्यांच्याविरूद्ध चौकशी सुरू केली आहे. या शूटआऊटनंतरच चौबेपुर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचार्‍यांचे विकास दुबेशी असलेले संबंध समोर आले होते.

विकास दुबे अजूनही फरार
8 पोलीस कर्मचार्‍यांना ठार करणारा विकास दुबे अजूनही सापडलेला नाही. पोलीस लागोपाठ छापेमारी करत आहेत. विकास दुबेची संपत्ती आणि बँक खात्यांवर सुद्धा पोलिसांची नजर आहे. दरम्यान, या घटनेच्या तीन दिवसानंतर सुद्धा विकासचा थांगपत्ता लागलेला नाही. मोस्ट वाँडेट विकास दुबे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही.

अशी घडली घटना
मागच्या गुरूवारी रात्री कानपूर ग्रामीणमधील बिकरू गावमध्ये विकास दुबेच्या घरावर छापेमारी करण्यासाठी पोलिसांचे पथक गेले होते. या पथकाचे नेतृत्व सीओ देवेंद्र मिश्रा करत होते. हे पथक विकास दुबेच्या घराच्या बाहेर पोहचताच, तेथे जेसीबी मशीन उभी होती. याकारणामुळे पोलीस पथकाला घरापासून काही अंतरावर आपली गाडी सोडावी लागली.

पोलीस पथक गाडीतून उतरताच विकास दुबेच्या घराकडे निघाले, तेथे अगोदरच दबा धरून बसलेल्या गुन्हेगारांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. काही कळण्यापूर्वीच अनेक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. या शूटआऊटमध्ये सीओ देवेंद्र मिश्रा यांच्यासह आठ पोलीस कर्मचारी शहीद झाले. या घटनेनंतर विकास दुबे फरार आहे.