विकास दुबेसोबत दिसला चौकीचा प्रभारी के.के. शर्मा, अमरच्या लग्नाचा फोटो व्हायरल

लखनऊ/कानपुर : वृत्तसंस्था – कानपुर शूटआऊटचा मुख्य आरोपी विकास दुबेचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये तो पोलीस ठाण्याचा इन्चार्ज के.के शर्मासोबत अमर दुबेच्या विवाह सोहळ्यात दिसत आहे. अमर दुबेसुद्धा विकास दुबेचा शूटर होता, ज्यास पोलिसांनी हमीरपुरमध्ये चकमकीत ठार केले. वायरल फोटोने विकास दुबे आणि पोलिसांचे संबंध ठळक केले आहेत. 30 जूनला अमर दुबेचे लग्न झाले होते. या विवाह सोहळ्यात विकास दुबे उपस्थित होता. विकास दुबेसोबत अमर दुबेच्या लग्नात पोलिस ठाण्याचा इन्चार्ज के.के शर्मा सुद्धा उपस्थित होता. केके शर्मा, अमर दुबे आणि त्याच्या पत्नीला आशीर्वाद देतानासुद्धा दिसला होता. के.के शर्मावर सुद्धा विकास दुबेला साथ दिल्याचा आरोप आहे.

अमर दुबेच्या पत्नीने विकास दुबेला पापा म्हटले
यासोबतच अमर दुबेच्या पत्नीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती विकास दुबेला पापा बोलताना दिसत आहे. या लग्नात विकास दुबे, अमर दुबेच्या पत्नीला गिफ्ट देण्यासाठी पोहचला होता. याच दरम्यान अमर दुबेच्या पत्नीने म्हटले की, माझा पापासोबत फोटो काढा.

के.के शर्मा अटकेत
2-3 जुलैच्या रात्री विकास दुबेच्या घरी पोलीस अधिकारी देवेंद्र मिश्रा आपल्या टीमसोबत धाड टाकण्यासाठी गेले होते. परंतु, ही खबर अगोदरच समजल्याने ते येण्यापूर्वीच सापळा रचून बसलेल्या विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी पोलीस पथकावर फायरिंग केली होती, ज्यामध्ये सीओ देवेंद्र मिश्रा यांच्यासह आठ पोलीस कर्मचारी शहीद झाले. विकास दुबेच्या निकटवर्तीयाने सांगितले की, धाडीची सूचना अगोदरच पोलीस ठाण्यातून विकासला मिळाली होती. यांनतर विकास दुबेसाठी काम करणारा चौबेपुरचा एसएचओ विनय तिवारी, पोलीस ठाणे इन्चार्ज केके शर्मासह अनेक पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले. नंतर पोलिसांनी चौकशी नंतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली. यादरम्यान केके शर्माने आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणत सुप्रीम कोर्टात याचिका सुद्धा दाखल केली होती.

विनय तिवारीने जानवे दाखवून वाचवला जीव
यादरम्यान विकास दुबेच्या विरूद्ध तक्रार करणारा राहुल तिवारीसुद्धा समोर आला आहे. हा तो व्यक्ती आहे, ज्याच्या एफआयआरनंतर पोलीस बिकरू गावात विकास दुबेवर धाड टाकण्यासाठी गेले होते. राहुलने पोलिसांना सांगितले होते की, विकास दुबेने त्याला रस्त्यातून उचलले होते आणि घरी नेऊन मारहाण केली होती. राहुल तिवारीचे म्हणणे आहे की, जेव्हा विकास दुबेने त्याला मारहाण केली तेव्हा चौबेपुर पोलीस ठाण्याचा एसओ विनय तिवारी सुद्धा त्यावेळी विकास दुबेसोबत उपस्थित होता, ज्यास सध्या अटक करण्यात आली आहे. राहुलचे म्हणणे आहे की, पोलीस ठाण्याचा एसओ विनय तिवारीने आपले जानवे दाखूवन विकास दुबेपासून माझा जीव वाचवला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like