Kantara Movie | “हा चित्रपट अतिशय खराब…” ‘कांतारा’वर ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाची टीका

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Kantara Movie | साऊथच्या चित्रपटांना हिंदी बॉक्स ऑफिसवर (Box Office) उत्तम प्रतिसाद मिळतो हे आपण अनुभवले असेलच. ‘पुष्षा’, ‘केजीएफ’ सारखे चित्रपट हे चित्रपट हिंदी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून साऊथचा आणखी एक चित्रपट ‘कांतारा’ हा (Kantara Movie) मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत जगभरात 243 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट समीक्षकांसह कलाक्षेत्रामधील अनेक दिग्गज मंडळींनी या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे. मात्र दिग्दर्शक अभिरूप बासूने (Abhirup Basu) या चित्रपटावर जोरदार टीका केली आहे.

 

‘कांतारा’ला मिळालेलं यश पाहता रिषभच्या कामाचं अनेक दिग्गज अभिनेत्यांनी कौतुक केले आहे. सुपरस्टार रजनीकांत (Suparstar Rajnikant) यांनीही हा चित्रपट पाहिल्यावर अंगावर काटा आल्याचे म्हंटले आहे. मात्र अभिरूप बासूने या चित्रपटाबद्दल दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने या चित्रपटाबद्दल बोलताना खराब चित्रपट असल्याचे सांगितले आहे.

 

 

अभिरूप बासू नेमके काय म्हणाला?
अभिरूप बासू या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले कि, “मला असं वाटतं की काही लोकांच्या बुद्धीमत्तेची या चित्रपटाद्वारे थट्टा करण्यात आली आहे.
हा चित्रपट अतिशय खराब आहे. शिवाय अंगावर येणाऱ्या या चित्रपटामधील पात्रही खरी वाटत नाहीत.
चित्रपटामध्ये खरेपणा नाही. तिच कंटाळवाणी कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे.
क्लायमॅक्सनंतर चित्रपट पाहण्याची इच्छा संपते. मला हा चित्रपट पाहण्यामध्ये काही रस नाही.”
देशभरात या चित्रपटाचं कौतुक होत असताना अभिरूपने चित्रपटावर केलेली टीका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अभिरूप बासू हा एक दिग्दर्शक आणि लेखक आहे. त्याने आतापर्यंत अनेक लघुपटांचं दिग्दर्शन केलं आहे.

 

Web Title :- Kantara Movie | filmmaker abhiroop basu slams rishab shetty kantara movie says film is laughable mockery of anyones intelligence see details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raigad News | रायगडचा स्वरूप शेळके अभियांत्रिकी पदवीका परीक्षेत राज्यात प्रथम; 99.70% गुण

Milind Narvekar | मिलिंद नार्वेकरांना ठाकरे गटाकडून धोका? सुरक्षेत वाढ

BSNL चे जबरदस्त प्लान्स, कमी किमतीत लाँग व्हॅलिडिटीसह भरपूर डेटा आणि बरंच काही