जेव्हा :डॉन’ दाऊद हा कपिल देवच्या ड्रेसिंग रूममध्ये येतो तेव्हा…

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना विरोधात निधी उभा करण्यासाठी भारत पाक क्रिकेट मालिका भरवावी अशी मागणी पाकिस्तानचा गोलंदाज शोएब अख्तरने केली होती. त्यावर भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनी त्याला क्रिकेट मालिकेवरून सडेतोड उत्तर दिले होते. त्यानंतर आता कपिल देव एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. शारजामध्ये 1987 साली सामन्याच्या दिवशी एक माणूस ड्रेसिंग रूम मध्ये आला. त्याला आमच्या खेळाडूंशी बोलायचे होते. मात्रा, मी त्याला बाहेर काढले होते.

कपिल देव यांनी दाऊदची भेट याबद्दल एक रोमांचक किस्सा सांगितला आहे. मला आठवतंय की 1987 साली शारजा येथील सामन्याच्या दिवशी एक माणूस ड्रेसिंग रूम मध्ये आला. त्याला आमच्या खेळाडूंशी बोलायचे होते. पण मी लगेच त्या माणसाला ड्रेसिंग रूममधून बाहेर जायला सांगितले, कारण खेळाडू सोडून इतर कोणालाही ड्रेसिंग रूम मध्ये येण्याची परवानगी नसते. त्या माणसाने माझे लगेच ऐकले आणि काहीही न बोलता तो बाहेर निघून गेला.

मला माहिती नव्हते की तो माणूस कोण आहे. मी त्याला सरळ बाहेरचा रस्ता धरायला सांगितला. त्यानंतर कोणीतरी मला सांगितले की तो मुंबईचा स्मगलर आहे आणि त्याचे नाव दाऊद इब्राहिम आहे. बास त्यापेक्षा अधिक काहीच घडले नाही, असे कपिल देव यांनी सांगितले आहे.