टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांना ह्दयविकाराचा झटका

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  भारतीय टीमचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांना ह्दयविकाराचा झटका आला आहे. दिल्लीतील एका रूग्णालयात त्यांच्यावर अ‍ॅजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालीच भारतीय टीमनं विश्वचषक जिंकला होता.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कपिल देव यांना ह्दयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सन 1983 मध्ये भारताला पहिला विश्वचषक जिंकून देण्यात कपिल देव यांचा मोठा वाटा होता.

You might also like