‘माझा मुलगा PM मोदी – HM शहांचा सेवक’, ‘शाहीन बाग’मध्ये फायरिंग करणार्‍या कपिल गुर्जरच्या वडिलांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (सीएए) विरूद्ध शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात काही दिवसांपूर्वी फायरिंग करणारा तरूण कपिल गुर्जरच्या वडीलांनी दिल्ली पोलिसांचा दावा फेटाळला आहे. कपिलचे वडील गजे सिंह गुर्जर यांनी आपला मुलगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समर्थक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या मुलास मोदी आणि शहांचा सेवक म्हटले आहे. कपिलच्या वडीलांनी बुधवारी ही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या वक्तव्यात कपिलच्या वडीलांनी दावा केला की, त्यांचा मुलगा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचा सेवक आहे.

फोटो चुकीच्या पद्धतीने सादर केले
दिल्ली पोलिसांनी मंगळवारी कपिल गुर्जर हा आम आदमी पार्टीशी संबंधीत असल्याचा दावा केला होता. परंतु, कपिलच्या वडीलांनी आणि भावाने हा दावा फेटाळला आहे. त्यांनी म्हटले की, आमचे कुटुंब होणत्याही राजकीय पक्षाशी संबधीत नाही. आम आदमी पक्षाच्या नेत्यांसोबत कपिलचे फोटो चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले आहेत.

माझा मुलगा मोदी समर्थक
परंतु, काही तासातच त्यांनी वेगळेच वक्तव्य केले. एका इंग्रजी वर्तमान पत्रानुसार गजे सिंह यांनी म्हटले होते की, माझा मुलगा पीएम मोदींचा समर्थक आहे. तो मोदी आणि अमित शहांचा अनुयायी आहे. परंतु, नंतर गजे सिंह म्हणाले कपिलचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, परंतु तो शाहीन बागमध्ये रस्ता बंद पडल्याने अस्वस्थ होता. कारण त्याला कामावर जाण्यासाठी एक तासाऐवजी चार तास लागत होते.

वडील आणि मुलाचा आप शी संबंध
तर दुसरीकडे, दिल्ली पोलीस क्राईम ब्रांचच्या माहितीनुसार, चौकशीत कपिलने सांगितले की, त्याने आणि त्याच्या वडीलांनी 2019 च्या सुरूवातीच्या महिन्यांमध्ये आम आदमी पार्टीचे सदस्यत्व घेतले होते. डीसीपी (क्राईम ब्रांच) राजेश देव यांनी सांगितले की, शाहीन बागमध्ये फायरिंगचा आरोपी कपिल गुर्जरने आपल्या फोनमधून हे फोटो डिलिट केले होते. त्यांनी हे देखील सांगितले की, सध्या हे फोटो टेक्निकल टीमच्या मदतीने रिकव्हर करण्यात आले आहेत. क्राईम ब्रांचने त्याच्या घरावर छापा मारून त्याचा फोन जप्त केला होता.