भिवंडी: पोलीसनामा ऑनलाइन – भिवंडीत आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी एक वादग्रस्त विधान करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. देशातील नागरिकांना वेळीच जाग आली नाही, तर भारताचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्यावर एक दिवस चंद्र दिसेल, असे कपिल पाटील (Kapil Patil) म्हणाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सनातन धर्माचे महत्व सांगितले आहे. भारत देश सनातन धर्मामुळे आकाराला आला आहे. त्यामुळे मी या ठिकाणी धर्मावर आणि राजकारणावर बोलणार नाही. जातपात, धर्म, पंथ यापेक्षा माणूसकीचा धर्म सर्वात मोठा आहे. भारतातील नागरिक वेळीच जागे झाले, तर चांगली गोष्ट आहे. अन्यथा, भारताच्या राष्ट्रध्वजावर चंद्र आल्याशिवाय राहणार नाही, असेही कपिल पाटील म्हणाले.
यावेळी कपिल पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission of India)
देखील एक मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) मतदार याद्या
लोकसभा आणि महानगरपालिका निवडणुकांना वापरल्या जातात. त्यामुळे मोठा घोळ होतो.
मतदार निवासाची जागा बदलत असल्याने त्यांची नावे नवीन ठिकाणच्या यादीत जात नाहीत.
त्यामुळे या याद्या दरवेळी नव्याने बनविण्यात याव्यात. महानगरपालिकेच्या याद्या प्रभागानुसार अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्देश द्यावेत, अशी मागणी कपिल पाटील यांनी यावेळी केली आहे.
Web Title :- Kapil Patil | moon in indian flag tiranga statement kapil patil in bhiwandi
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | रिव्हर्स घेताना कार घातली अंगावर; डॉक्टर महिलेवर गुन्हा दाखल
Deepali Sayyad | ठाकरे गटाला मोठा धक्का! दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार; केले गंभीर आरोप