कपिल शर्माची ‘क्युट’ मुलगी ‘अनायरा’चे फोटो सोशलवर ‘चर्चेत’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कॉमेडी किंग कपिल शर्मा बाप झाल्यानंतर अनेक स्टार्स त्याची मुलगी अनायराला भेटायला जाताना दिसत आहेत. कपिल शर्माच्या नन्ह्या एंजलचे फोटो सध्या सोशल व्हायरल होताना दिसत आहेत. तिचे काही ताजे फोटोही समोर आले आहेत. समोर आलेल्या फोटोत दिसत आहे की, कपिलची लाडकी अनायरा रिया तिवारीच्या मांडीवर आहे. कपिल शर्मा रिया तिवारीला बहिण मानतो. कपिलच्या अनेक फोटोंमध्ये ती दिसली आहे.

https://www.instagram.com/p/B9RLYx4hUQC/

https://www.instagram.com/p/B9CeRlwB4Rx/

रियाच्या कडेवर असेलील अनायरा खूपच क्युट दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील क्युटनेस पाहण्यासारखा आहे. चेक शर्ट, पिंक कलरची लेगिंग आणि सॉक्स घातलेली अनायरा खूपच सुंदर दिसत आहे. तिनं घातलेल्या हेअर बँडमुळं तर तिच्या क्युटनेसला चार चांद लागले आहेत. सिंगर ऋचा शर्मा आणि सुदेश लहरी यांनीही कपिलच्या मुलीची भेट घेतली आहे. सुदेशनं अनायरा सोबत फोटो शेअर केला ज्याला सर्वाधिक लाईक्स आणि शेअर मिळाले होते.

रियानं स्वत: तिच्या इंस्टावरून अनायरा सोबतचे हे फोटो शेअर केले आहेत. काही तासांतच हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी हे फोटो लाईक केले आहेत. काहींनी कमेंट करत क्युट दिसणाऱ्या अनायराचं कौतुक केलं आहे.