‘बेबो’ करीनासोबत ‘फ्लर्ट’ करणाऱ्या कपिल शर्माला सैफनं झापलं ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – द कपिल शर्मा शोमध्ये प्रमोशनसाठी येणाऱ्या सर्वच कलाकारांसोबत कपिल खूप मस्ती करताना दिसत असतो. अनेकदा तो हिरोईन्स सोबत फ्लर्टींग करतानाही दिसत असतो. गुड न्यूज सिनेमाच्या प्रमोशनला आलेल्या बेबो करीना कपूर सोबतही त्यांनी फ्लर्ट केलं होतं. सैफ अली खाननं मात्र कपिलची मजेदार शब्दात या गोष्टीवरून कानउघडणी केली आहे.

अभिनेता सैफ अली खान, आपल्या जवानी जानेमन या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये आला होता. यावेळी एन्ट्रीनंतर सैफ कपिलला म्हणतो, “मागच्या वेळेस माझी पत्नी करीना शोमध्ये आली होती. त्यावेळी तू खूप मस्करी केली होती.” सैफचा रोख फ्लर्टींगकडे होता हे स्पष्ट दिसत होता. यावर हजरजबाबीपणा दाखवत आणि मजेशीर अंदाजात कपिलनं उत्तर दिलं की, “तुमचीच काय कोणाचीही बायकोसोबत अशीच मस्करी(फ्लर्टींग) करत असतो.” सैफ आणि कपिलचा हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. सैफ आपल्या सिनेमाच्या पूर्ण टीमसह शोमध्ये आला होता.

सैफ अली खान, अलाया फर्निचरवाला, चंकी पांडे, तब्बू आणि कुब्रा सैत स्टारर जवानी जानेमान हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. सिनेमानं पहिल्या दिवशीच 4 ते 5 कोटींची कमाई केल्याचं समजत आहे. चाहत्यांना सिनेमा आवडत असल्याचं बोललं जात आहे.