कार डिझायनर दिलीप छाब्रियाने केलेल्या फसवणूक आणि बनावट प्रकरणाबाबत कपिल शर्माची चौकशी

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कार डिझायनर दिलीप छाब्रियाने केलेल्या फसवणूक आणि बनावट प्रकरणाबाबत कपिलची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई क्राईम ब्रँचने समन्स पाठवले आहेत आणि चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी २८ डिसेंबरला डीसी डिझाईनचे संस्थापक आणि प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियाला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. छाब्रिया यांच्यावर फसवणूकीचा आणि बनावट केल्याचा आरोप आहे. त्याच्या विरोधात कलम ४२०, ४६५, ४६७, ४७१, १२० बी आणि ३४ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

दिलीप यांनी भारतातील स्पोर्ट्स कार डिझाईन केली होती. त्यांनी अमिताभ बच्चन पासून ते शाहरुख खान पर्यंत अनेक सेलिब्रिटींची कार डिझाईन केली आहे. कारसोबतंच ते सेलिब्रिटींच्या आलिशान वॅनिटी देखील डिझाईन करतात. शाहरुखसोबतंच कपिलकडे देखील दिलीप यांनी डिझाईन केलेली वॅनिटी वॅन आहे. कपिल शर्माने कार डिझायनर दिलीप छाब्रियाच्या विरोधात फसवणूक आणि बनावट केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. आता त्याला साक्षीदार म्हणून त्याचा जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं आहे. दिलीप छाब्रिया भारतातील प्रसिद्ध कार डिझायनर म्हणून ओळखले जातात.