सिद्धूंना शो मधून काढून टाकण्यावरुन कपिल शर्माने केले ‘हे’ वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ४४ जवान शाहिद झाले. या घटनेनंतर या हल्ल्याचा देशभर निषेध करण्यात आला मात्र या हल्ल्याबाबत काँग्रेसनेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी मात्र ‘काही लोकांसाठी देशाला जबाबदार धरू नका’ अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे नेटकरी सिद्धू यांच्यावर चांगलेच संतापले. एव्हढेच नाही तर त्यांना कपिल शर्माच्या शो मधून काढून टाकण्यात आल्याची देखील माहिती आहे. मात्र कॉमेडियन कपिल शर्मा सिद्धू यांच्या मदतीला धावून आला आहे. कपिलने सिद्धू यांची पाठराखण केली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कपिल म्हणाला “कलाकारांवर बंदी घालणे किंवा सिद्धू यांना शोमधून बाहेर काढणे हा समस्येवर उपाय असु शकत नाही. या प्रश्नावर काही ठोस तोडगा काढला पहिजे. जर केवळ सिद्धू यांना शो मधून काढून टाकण्याने हा प्रश्न सुटला असता तर ते स्वतःच हा शो सोडून गेले असते. आपल्याकडे आता तरुणांना भरकटवण्याचे काम सुरू झालंय. #BoycottSidhu, #Boycottkapilsharmashow असे हॅशटॅग चालवण्याचं काम त्यांना दिलं जाते. ज्यामुळे आसपासची परिस्थिती, ज्या प्रश्नांवर बोलायला हवे असे विषय या सगळ्यांपासून तरुणांचे लक्ष वेगळ्याच विषयांकडे वळवलं जातं. मला वाटतं आपण नेमकी समस्या काय आहे, त्यावर उपाय कसा शोधता येईल याचा विचार करायला पाहिजे.’

याबाबरोबरच नवज्योत सिंग सिद्धू यांना शोमधून काढण्यात आले नसल्याचे त्याने सांगितले. ‘सिद्धू सध्या त्यांच्या काही खासगी कामांमध्ये व्यग्र असल्याने ते शोमध्ये काही एपिसोड्स दिसणार नाहीत.’ असंही तो म्हणाला.